अर्पिताने सलमान खानसाठी लिहीली इमोशन पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते आणि घरातली मंडळी सध्या त्याच्या जामीनावर खूष आहेत. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्या संदर्भात त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड देण्यात आला. 

Dakshata Thasale Updated: Apr 9, 2018, 04:11 PM IST
अर्पिताने सलमान खानसाठी लिहीली इमोशन पोस्ट  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते आणि घरातली मंडळी सध्या त्याच्या जामीनावर खूष आहेत. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्या संदर्भात त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड देण्यात आला. 

2 दिवस कारागृहात राहिल्यानंतर सलमान खानची जामीनावर सुटका होत आहे. सलमान खान घरी आल्यावर त्याचे कुटुंबिय भरपूर खूष आहेत. यादरम्यान सलमान खानची छोटी बहिण अर्पिता खान हिने इंस्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानकरता एक इमोशनल पोस्ट केली आहे. 

अर्पिताने लिहिलंय हा मॅसेज 

अर्पिताने लिहिलं आहे की, माझी हिम्मत, माझी कमतरता, माझा गर्व, माझा आनंद, माझं आयुष्य, माझं जग, ईश्वराचा वरदा असलेल्या व्यक्तीला देवा तू आनंदात ठेव. तिने सलमानसाठी लिहिलेल्या या मॅसेजमध्ये देवाकडे सलमानसाठीची प्रार्थना आहे. 

अर्पिताच्या पोस्टला काहींचा दुजोरा तर काहींचा विरोध अर्पिता ही सलमान खानची लहान बहिण. सलमान खानसोबत जोधपुरमध्ये अर्पिता सतत त्याच्यासोबत होती. तिच्या या सपोर्टनंतर तिने सलमानसाठी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी सपोर्ट दर्शवला आहे तर काहींनी या पोस्टनंतर अर्पिताला ट्रोल केलं आहे.