The Kashmir Files : गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI 2022) सध्या इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी या चित्रपट महात्सवात प्रमुख ज्युरी म्हणून भाग घेतला होता. यावेळी लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. लॅपिड यांनी चित्रपटाला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रपोगंडा’ असणारा म्हटलं आहे. हा वाद इतका वाढला की, इस्रायलच्या राजदूतांना मध्यस्थी करावी लागलीय. राजदूत कोब्बी शोशानी यांनी लॅपिड यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटले आहे. तर दुसरीकडे लॅपिड यांनी त्यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले होते नदाव लॅपिड?
"द काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर आम्ही सगळेच अस्वस्थ झालो होतो. हा चित्रपट व्हल्गर आणि प्रोपोगॅंडावर आधारित असल्याचे वाटते. एवढ्या मोठ्या चित्रपट महोत्सवासाठी हा चित्रपट योग्य नाही. मी माझ्या भावना उघडपणे सगळ्यांसमोर मांडत आहे कारण या कार्यक्रमात आपण टीका स्वीकारतो आणि त्यात नक्की काय चूकीचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. 'द काश्मीर फाइल्स' मुळे सगळ्यांना धक्का बसला होता," असे लॅपिड म्हणाले.
#Breaking: #IFFI Jury says they were “disturbed and shocked” to see #NationalFilmAward winning #KashmirFiles, “a propoganda, vulgar movie” in the competition section of a prestigious festival— organised by the Govt of India.
Over to @vivekagnihotri sir…
@nadavlapi pic.twitter.com/ove4xO8Ftr— Navdeep Yadav (@navdeepyadav321) November 28, 2022
लॅपिड यांचे स्पष्टीकरण
नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' बाबत केलेल्या विधानाबद्दल स्थानिक माध्यम यनेटला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. "त्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात लोक होते जे स्थानिक कलाकारांना पाहून आनंदी होते. ज्या देशांमध्ये वेगाने मनातलं बोलण्याची किंवा सत्य बोलण्याची क्षमता कमी होत चालली आहे, तेथे कोणीतरी बोलणे आवश्यक आहे. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला, तेव्हा मला माहिती होते की, ही अशी घटना आहे, जी देशाशी संबंधित आहे. असे विधान करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला, तेव्हा मी तसा चित्रपट इस्त्रायलमध्ये बनण्याची कल्पना करू शकलो नाही. पण येणाऱ्या काळात नक्कीच बनवू शकतो. मी अशा ठिकाणाहून आहे जिथे कोणतीही सुधारणा नाही. हे करण्याआधी मी घाबरलो आणि अस्वस्थ होतो. या चित्रपटाने मला अस्वस्थ केले. या विषयांवर कोणालाही बोलायची इच्छा नाही, म्हणून मला उभे राहावे लागले आणि मी बोललो. माझ्या भाषणानंतर उपस्थित लोकांनी माझे आभारही मानले," असे नदाव लॅपिड यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा >> The Kashmir Filesवर टीका करणाऱ्यांना Anupam Kher आणि अशोक पंडित यांनी दिलं सडेतोड उत्तर
विवेक अग्निहोत्रींचे आव्हान
लॅपिड यांच्या वक्तव्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही जोरदार टीका केली आहे. चित्रपटात जे काही दाखवले ते खरे नव्हते हे जर कोणी सिद्ध केले तर चित्रपट बनवणे बंद करेल, असे आव्हान विवेक अग्निहोत्री यांनी दिले आहे.