VIDEO : नागार्जुनने जेव्हा होणाऱ्या सुनेला सर्वांसमोर म्हटलं होतं So Hot, म्हणतो 'तिच्याविषयी मला आकर्षण...'

नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. यानंतर नागार्जुनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नागार्जुन सुनेला का असं म्हणाला. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 12, 2024, 08:49 PM IST
VIDEO : नागार्जुनने जेव्हा होणाऱ्या सुनेला सर्वांसमोर म्हटलं होतं So Hot, म्हणतो 'तिच्याविषयी मला आकर्षण...' title=

दक्षिणेतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी लग्नगाठ बांधली आहे. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी आपले नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरम्यान, नागार्जुनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आपल्या भावी सुनेचे म्हणजे शोभिता धुलिपालाचं कौतुक करताना दिसत आहे.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील पॉवर कपलपैकी एक असलेल्या नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर दोघांनी साखरपुडा केला आहे. एंगेजमेंटनंतर दोघांचा पहिला फोटो नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. या जोडप्याने आता साखरपुडा करून आपलं नातं पुढे नेलं आहे.

अभिनेता नागार्जुन आणि त्याचा मुलगा नागाची गर्लफ्रेंड शोभिता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नागार्जुन आपली भावी सून शोभिताच्या सौंदर्याची प्रशंसा करताना दिसत आहे.

शोभिता वाटली 'हॉट'

मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, Reddit वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो 2018 च्या Advi Sesh च्या Goodachari Success Meet दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये नागार्जुन म्हणतो की, शोभिता धुलिपाला खूप हॉट आहे. म्हणजे मी हे म्हणू नये, पण ती चित्रपटात हॉट दिसत होती. मला असे म्हणायचे आहे की, असे काहीतरी आहे ज्यामुळे ती खूपच आकर्षक दिसते.

त्या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी त्याला ट्रोल केले तर काहींनी त्याचे समर्थन केले. नागा चैतन्यचे पहिले लग्न समंथा रुथ प्रभूसोबत झाले होते, पण दोघेही 2021 मध्ये वेगळे झाले. यानंतर नागाचं नाव शोभितासोबत जोडलं जाऊ लागलं आणि आता साखरपुड्यानंतर त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

Nagarjuna ने पोस्ट शेअर केली

नागार्जुनने त्याच्या X हँडलवर नागा आणि शोभिताचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये हे जोडपे वडील नागार्जुनसोबत पोझ देताना दिसत आहे. तर, दुसऱ्या चित्रात जोडपे हातात हात घालून पोज देत आहे.