मुंबई : घटस्फोटानंतर अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत, पण त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असतात. नुकताच समंथाने दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. शोमध्ये समंथाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. आता नागा चैतन्यनेही कॉफी विथ करणमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, या ठिकाणी अभिनेत्याला तुटलेल्या नात्याबद्दल देखील व्यक्त व्हाययचं आहे.
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य लवकरच आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच सिनेमातील त्याचा पहिला लूक समोर आला होता जो चाहत्यांना प्रचंड खूप आवडला होता. सध्या चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, दरम्यान, एका मुलाखतीमध्ये नागाने करण जोहरच्या शोमध्ये जाण्याती इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, 'मला संधी मिळाली तर का नाही? करण जोहर महान आहे, मला त्याचं काम आवडतं...'
पुढे नागा म्हणाला, 'जर करणने मला शोमध्ये बोलावलं तर नक्कीच जाईल? याशिवाय नागाने लोक त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल कशा प्रकारे चर्चा करततात, याबद्दल देखील नागाने सांगितलं आहे.
'मी प्रोफेशल आयुष्यापेक्षा जास्त खासगी प्रकरणांमुळे चर्चेत असतो. खासगी आयुष्याबाबत बातम्या पाहायल्या मिळाल्या तर वाईट वाटतं.. ' असं देखील नागा चैतन्य या वेळी म्हणाला.
त्यांमुळे करणने 'कॉफी विथ करण' शोमध्ये नागा चैतन्याला बोलावलं तर अभिनेता कोणत्या गोष्टींचा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.