हिंदी ‘सैराट’साठी नागराज मंजुळेचा करण जोहरला मदत करण्यास नकार!

दिग्दर्शक करण जोहर लवकरच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन ‘सैराट’ या सिनेमाचा हिंदी रिमेक करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या मराठीतील सुपरहिट सिनेमाच्या हिंदी रिमेकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.

Updated: Aug 25, 2017, 07:49 PM IST
हिंदी ‘सैराट’साठी नागराज मंजुळेचा करण जोहरला मदत करण्यास नकार! title=

मुंबई : दिग्दर्शक करण जोहर लवकरच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन ‘सैराट’ या सिनेमाचा हिंदी रिमेक करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या मराठीतील सुपरहिट सिनेमाच्या हिंदी रिमेकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.

मराठी सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नागराज मंजुळे यांचं असल्याने करणने नागराजने हिंदी सिनेमासाठी मदत करावी, अशी ईच्छा व्यक्त केली. मात्र, नागराज मंजुळे यांनी मदत करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे समजते. 

डीएनएने दिलेल्या वॄत्तानुसार, दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या अमिताभ बच्चनसोबत त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. नागराजने करणला नाही म्हणण्याचं हे एक कारण तर आहेच, शिवाय नागराजला करण जोहरचा उतावीळपणा फारसा भावलेला दिसत नाही. करणला सिनेमाच्या मूळ कथेत काही नवीन प्रयोग करायचे आहेत. त्याचबरोबर तो जान्हवीला एका गावातील मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणू इच्छितो, हीच बाब नागराजला खटकत आहे. त्यामुळे त्याने करणला मदत न देण्याबरोबरच या प्रोजेक्टपासून चार हात लांब राहण्याचे स्पष्ट केले आहे. 

जान्हवीला लॉंच करण्यासाठीच करण हा सर्व खटाटोप करत आहे. वास्तविक तिचा लूक गावातील मुलीप्रमाणे अजिबातच वाटत नाही. शिवाय ती एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी आहे, हेही प्रेक्षक चांगल्या प्रकारे जाणून आहेत. म्हणून ‘सैराट’मध्ये संधी दिली जात असेल तर ते फारसे पटणारे नाही. त्याचबरोबर सिनेमातील अभिनेताही गरीब दाखविण्यात येणार आहे. मात्र त्याची मस्क्युलर बॉडी बघून तो कुठल्याच अ‍ॅँगलने गरीब दिसत नाही. अशात हे दोन्ही पात्र कथेच्या विपरित असल्याने नागराज या प्रोजेक्टपासून दूर राहत असल्याचे समजते.