कधी करायचा सेक्युरीटी गार्डची नोकरी... आता झाले मोठे दिग्दर्शक

२०१६ मधील सर्वात मोठा सिनेमा 'सैराट' बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. ४ कोटीमध्ये बनलेला हा सिनेमा ११० कोटीची कमाई करुन गेला. सिनेमा हिट होताच सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे चर्चेत आले होते. आता नागराज बॉलिवुडमध्ये डेब्यू करत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आता ते सिनेमा करत आहे.

Updated: Aug 10, 2017, 04:08 PM IST
कधी करायचा सेक्युरीटी गार्डची नोकरी... आता झाले मोठे दिग्दर्शक title=

मुंबई : २०१६ मधील सर्वात मोठा सिनेमा 'सैराट' बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. ४ कोटीमध्ये बनलेला हा सिनेमा ११० कोटीची कमाई करुन गेला. सिनेमा हिट होताच सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे चर्चेत आले होते. आता नागराज बॉलिवुडमध्ये डेब्यू करत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आता ते सिनेमा करत आहे.

मराठी फिल्म सैराट सुपरहिट झाल्यानंतर आता नागराज मंजुळे जानेवारीपासून अमिताभ यांच्यासोबत सिनेमावर काम सुरु करणार आहेत.

नागराज मंजुळे यांच्या जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये झाला. आर्थिक परिस्थिती आधीपासून नाजुक होती. लहानपणापासूनच त्यांना सिनेमामध्ये रुची होती.

सिनेमा पाहण्यासाठी नागराज यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांना व्यसनाची देखील सवय लागली होती. त्यानंतर त्यांनी पुस्तकं वाचणे सुरु केलं. त्यानंतर त्यांनी मराठीमध्ये एमए केलं आणि एमफिल करत करत मास कॉमला देखील अॅडमिशन घेतलं.

काही दिवसानंतर त्यांची निवड महाराष्ट्र पोलीसमध्ये झाली. पण ते नोकरी सोडून पुन्हा गावी गेले. आर्थिक चणचण यामुळे ते सेक्युरिटी गार्डची देखील नोकरी करु लागले. त्यानंतर लोकांचे कपडे देखील प्रेस करु लागले.