#MeToo लोकप्रिय चित्रकार जतिन दास यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला आणि. 

#MeToo लोकप्रिय चित्रकार जतिन दास यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप  title=

मुंबई : #MeToo प्रकरणात दिवसेंदिवस मोठ मोठ्या व्यक्तींच्या नावाचा समावेश होताना दिसत आहे. कागद कंपनीचं उत्पादन करणाऱ्या एका मोठ्या कंपनीच्या सह संस्थापक महिलेने मंगळवारी लोकप्रिय चित्रकार जतिन दास यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. 14 वर्षा अगोदर या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र दास यांनी हे आरोप 'अश्लील' असल्याचं सांगून फेटाळले आहेत. दास हे 'मी टू' अभियानातील लैंगिक अत्याचाराचा सामना करणारे पहिले लोकप्रिय व्यक्ती आहेत. 

निशा बोरा नावाच्या या महिलेने सर्व प्रकार ट्विटरवर शेअर केला. त्यांच असं म्हणणं आहे की, त्या 28 वर्षांच्या असताना दास यांनी रात्रीच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान विचारलं की, त्यांच सामान व्यवस्थित करण्याची इच्छा आहे. याकरता त्यांच्याकडे वेळ देखील आहे. 

जेव्हा त्यांनी हा प्रस्ताव स्विकारला तेव्हा दास यांनी आपल्या स्टुडिओत माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. निशाने ट्विटरवर लिहिलं आहे की, त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मी त्यांच्या हातातून निसटले. मी तेव्हा त्यांच्यावर रागावले त्यानंतर मी त्यांना धक्का देऊन निघून गेले.