नवरी नटली! गाण्यावर Dancing Dad ricky pondचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ

डान्सिंग डॅडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला

Updated: May 1, 2021, 03:44 PM IST
नवरी नटली! गाण्यावर Dancing Dad ricky pondचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ

मुंबई : नवरी नटली हे गाणं जवळपास प्रत्येक लग्नात वाजतं. या गाण्यावर नाचण्याचा मोह आता डान्सिंग डॅड म्हणून प्रसिद्घ असलेल्या परदेशातील माणसालाही आवरला नाही. सगळीकडे कोरोनाचं संकट असताना IPL आणि अशा प्रकारच्या व्हिडीओंमुळे मनोरंजन होताना दिसत आहे. डान्सिंग अंकलनंतर आता हा डान्सिंग डॅडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 नवरी नटली या गाण्यावर विदेशातील रिकी पॉन्ट नावाच्या या व्यक्तीनं तुफान डान्स केला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. या डान्सिंग डॅडचा आधी भोजपुरी गाण्यामधील व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर तो व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय झाला होता. नवरी नटली या गाण्यावर केलेल्या डान्सला देखील आता 24 हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

रिकी पॉन्ड इंस्टाग्रावर हजारो लोकांप्रमाणेच डान्स व्हिडिओ अपलोड करत असतो. या अगोदर बॉलिवूड म्युझिक आणि वेगवेगळी गाणी निवडून डान्स करत असतो. त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटला अनेक भारतीय लोकांनी फॉलो केलं आहे.