मुंबई : चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये येतो. त्याच्याबरोबर काम करणं आज प्रत्येक कलाकारचं स्वप्न आहे. पण नवाजला ईथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. सिनेमात चोर असण्यापासून ते पोलिस अधिकारी होण्याचा हा प्रवास नवाजांसाठी फारच कठीण होता.
नवाजुद्दीनने त्याच्या संघर्षांचा उल्लेख बर्याच वेळा केला आहे. अलीकडेच नवाजुद्दीनने त्याच्या कारकीर्दी संबंधित असाच एक किस्सा सांगितला आहे आणि यामुळेच तो खूप रडला देखील आहे. कमल हासन यांनी चित्रपटातील त्याची छोटी भूमिका कापायला लावली तेव्हाचा हा किस्सा आहे,
हा किस्सा आठवत नवाज यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ''जेव्हा मी एखाद्या चित्रपटात छोटी भूमिका साकारली, तेव्हा असं बऱ्याचवेळा घडलं की, तो सीन सिनेमातून हटवण्यात आला. पण मला नेहमीच माझे आयडल कमल हासन यांच्याशी संबंधित एक किस्सा आठवत आहे. त्यांच्या 'राम राम' चित्रपटात मी त्यांचा हिंदी संवाद प्रशिक्षक होते.
ते या चित्रपटाचे दिग्दर्शनही करीत होते आणि मुख्य भूमिकेत देखील तेच होते. जेव्हा कमल हसन जी यांनी मला या चित्रपटात एका छोट्या भूमिकेची ऑफर दिली, तेव्हा मला खूप आनंद झाला मी खूप उत्सुक होतो. ते नेहमी माझ्यासाठी एक आइडियल्स होते. मी त्यांचे सिनेमा कित्येकवेळा पाहिले आहेत.
'ती भूमिका माझ्यासाठी खरोखर महत्वाची भूमिका होती. त्यामध्ये मला एका पीडिताची भूमिका साकारायची होती, ज्याला जमावाने मारहाण केलेली असते आणि कमल हसन मला वाचवण्यासाठी येतात. कमल हासन जींसोबत मी स्क्रीन शेअर करायला मिळणार याचा मला खूप आनंद झाला. पण मग माझा रोल सिनेमातून कापला. हे मला कळताच मी खूप रडलो.
मला आठवतं जेव्हा मी त्यांची मुलगी श्रुती हासनने त्यावेळी मला सांभाळलं आधार दिला. जरी कमल जी यांनी माझी भूमिका सिनेमातून कापली होती, मात्र तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच चुकीच्या भावना नव्हत्या. मी त्यांच्यावर रागावणार तरी कसा? कमल जी एक कंम्प्लिट आर्टीस्ट आहेत.