नवाजु्द्दीन सिद्धीकीच्या 'मंटो' चा जबरदस्त ट्रेलर...

पाहा हा ट्रेलर 

नवाजु्द्दीन सिद्धीकीच्या 'मंटो' चा जबरदस्त ट्रेलर...  title=

मुंबई : अखेर ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो ट्रेलर लाँच झाला. अभिनेत्री - फिल्ममेकर नंदिता दासने मंटो या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. नवाजुद्दीनच्या मंटोचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे. या सिनेमातून आपल्याला लेखक मंटो यांच्या जीवनाची ओळख करून दिली आहे. या ट्रेलरमध्ये बॉलिवूडचे दिग्गज लेखक जावेद अख्तर हे वकिल म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सिनेमा परेश रावल आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत ऋषी कपूर दिसणार आहे. 

नंदिता दास यांच्या या सिनेमात तरूणांचे आवडते लेखक सहादत हसन मंटो यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. मंटोचं कॅरेक्टर नवाजुद्दीन सिद्धीकी साकारताना दिसत आहे. या सिनेमातील अनेक डायलॉग तु्म्हाला विचार करायला भाग पाडतील. 2 मिनिट 22 सेकंदाचा असलेला हा ट्रेलर तुम्हाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या सिनेमात नवाजुद्दीनसोबत रसिका दुग्गल, ताहिर राज भसीन, ऋषी कपूर, दिव्या दत्ता आणि परेश रावल सारखे कलाकार आहेत. हा सिनेमा 21 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.