60 वर्षांच्या नीना गुप्तांचा बोल्ड अंदाज

'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमात लवकरच झळकणार 

Updated: Dec 8, 2019, 04:53 PM IST
60 वर्षांच्या नीना गुप्तांचा बोल्ड अंदाज

मुंबई : बॉलिवूडमधील एक अभिनेत्री तिच्या वयाबरोबर नवीन स्टाईल घेऊन प्रेक्षकांसमोर येते ती म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता Neena Guptav. आपल्या अभिनयाने सगळ्याच प्रेक्षकांच मन जिंकणाऱ्या नीना गुप्ता सध्या त्यांच्या नव्या स्टाईलमुळे चर्चेत आल्या आहेत. Frock ka Shock म्हणतं नीना गुप्ता यांनी आज सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. 

नीना यांनी आपल्या 30 वर्षीय मुलगी मसाबाच्या कलेक्शनमधील अतिशय कॅज्युअल कपडे घातले आहेत. या फ्रॉकमध्ये 60 वर्षीय नीना गुप्ता अतिशय सुंदर आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Frock ka shock. Picture taken by the gajraj sir

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

अतिशय शॉर्ट असलेला हा ड्रेस घालून नीना गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आहे. यावरून कळतंय की अभिनेत्री जी वेशभूषा करतात त्यावरून तो लूक अतिशय चांगल कॅरी करतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Frock ka shock. Picture taken by the gajraj sir

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

या फोटोत त्यांनी हलक्या पिवळ्या रंगाचा मिनी फ्रॉक घातला आहे. या खाली त्यांनी सफेद रंगाचे टी घातले असून काळ्या रंगाचे सायकलिंग शॉर्ट्स घातले आहेत. Frock ka Shock म्हणतं हा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. गजराज सरांनी हा फोटो घेतला असून या फोटोला 38 हजाराहून अधिक लाईक्स आणि भरपूर कमेंट मिळाल्या आहेत. 

नीना गुप्ता यांनी आपल्या अभिनयातून कायमच प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. आता नीना गुप्ता अभिनेता आयुष्मान खुरानासोबत 'शुभ मंगल ज्यादा सावधान' Shubh Mangal Zyada Saavdhan या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा सिनेमा 2016 च्या 'शुभ मंगल सावधान' Shubh Mangal Saavdhan चा सीक्वल आहे. 21 फेब्रुवारी 2020 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.