Rajesh Khanna यांची वरात गर्लफ्रेंडच्या दारात; त्यांना नाकारणारी 'ही' अभिनेत्री कोण?

Rajesh Khanna यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान, राजेश खन्ना यांना लग्नासाठी नकार देणारी 'ही' अभिनेत्री कोण चला जाणून घ्या...

Updated: Dec 29, 2022, 01:54 PM IST
Rajesh Khanna यांची वरात गर्लफ्रेंडच्या दारात; त्यांना नाकारणारी 'ही' अभिनेत्री कोण? title=

Rajesh Khanna Birthday: बॉलिवूड दिग्गज अभिनेते आणि सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh khanna) यांचा आज वाढदिवस आहे. राजेश खन्ना यांना काका म्हणून लोक ओळखतात. राजेश खन्ना यांचा आज 80 वा वाढदिवस आहे (Rajesh Khanna 80th Birthday) . राजेश खन्ना यांच्या चाहत्यांच्या यादीत सगळ्यात जास्त संख्या ही महिलांची होती. त्यांच्या प्रेमात मुली वेड्या होत्या. दरम्यान, असे देखील म्हटले जाते की 1970 मध्ये राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर इतक्या मुलींची पत्रे यायची की ती वाचण्यासाठी वेगळा माणूस ठेवावा लागायचा. धक्कादायक म्हणजे, यातली काही पत्र ही रक्तानं लिहिलेली होती. मात्र, तुम्हाला माहितीये एक काळ असा होता जेव्हा राजेश खन्ना आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू ( Rajesh Khanna and Anju Mahendru Affair) यांच्या नात्याची प्रचंड चर्चा सुरु होती. पण काही कारणांमुळे दोघांचे लग्न होऊ शकलं नाही. यामुळे लग्न झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी त्यांची गाडी अंजू महेंद्रू यांच्या घरासमोरून नेली जेणेकरून अभिनेत्रीला राग येईल. 

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्र यांची पहिली भेट ही 1966 साली झाली होती. त्यावेळी राजेश खन्ना ही प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. तेव्हा पहिल्याच नजरेत राजेश खन्ना आणि अंजू यांनी एकमेकांना पसंत केलं. तर त्या काळात अंजू या करिअरच्या सुरुवातीच्या स्ट्रगलिंगच्या दिवसात होत्या आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. 

Rajesh Khanna s girlfriend Anju Mahendru said no to get married in revenge actor did this

1966 साली पहिली भेट, त्यानंतर राजेश खन्ना आणि अंजू यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं पण ते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. अंजू यांच्यासोबत लग्न करून सेटल होण्याची राजेश खन्न यांची इच्छा होती. मात्र, लग्नानंतर अंजू यांनी चित्रपटांमध्ये काम करू नये अशी राजेश खन्ना यांची एक अट होती. दरम्यान अंजू यांना राजेश खन्ना यांची ही अट मान्य नव्हती. रिपोर्ट्सनुसार, राजेश खन्ना आणि अंजू 1966 ते 1972 जवळपास 7 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 

हेही वाचा : कोण कुठला अक्षय कुमार? लग्नानंतर असं का म्हणते Twinkle Khanna

राजेश खन्ना यांच्या या अटीमुळे त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडी (Dimple Kapadia) यांच्यासोबत लग्न केले. राजेश खन्ना यांना तरी अंजू यांच्यावर असलेला राग थांबला नव्हता. डिंपल कपाडीया यांच्यासोबत लग्न ठरल्यानंतर त्यांची वरात ही राजेश यांनी अंजू यांच्या घरासमोरून काढली. इतकंच नाही तर अंजू यांच्या घरासमोर राजेश खन्ना यांची वरात जवळपास अर्धा तास थांबली आणि त्यांनी तिथे डान्सही केला.