अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक? विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य

विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध... त्यानंतर प्रियकराच्या मुलीला दिला जन्म... अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्री व्यक्त    

Updated: Oct 16, 2022, 04:06 PM IST
अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक? विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य title=

मुंबई : प्रेम... फक्त हा शब्द जरी कानावर आला तर, प्रत्येका आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीचा चेहरा समोर येतो. जेव्हा व्यक्ती एखाद्याच्या प्रेमात पडतो, तेव्हा तो कोणत्याही गोष्टीची पर्वा करत नाही. फक्त त्या खास व्यक्तीसाठी आपण त्याग करायला तयार होतो. पण जेव्हा नात्यात त्याग फक्त एकाच व्यक्तीला करायचा असले तर...? इंडस्ट्रीमध्ये देखील अशा एक अभिनेत्री आहेत ज्यांनी कधीही लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला तरुणींना दिला. ( neena gupta affairs)

आपण एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करतो, पण ती व्यक्ती गरजेच्या वेळी आपली साथ देत नाही, तेव्हा आयुष्यात आलेलं संकट एकट्याने पेलावण्याची ताकद असलेल्या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता (neena gupta). 

हल्लीच त्या त्यांच्या ऑटोबायोग्राफीमुळे चर्चेत आल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी एक सिंगल मदर होणं काय असतं आणि त्यांनी आपल्या मुलीला त्यातून कसं वाढवलं याबद्दल सांगतली आहे. एवढंच काय तर या ऑटोबायोग्राफीमुळे नीना गुप्ता यांच्या खासगी जीवनातील अतिशय नाजुक गोष्टी देखील सर्वांसोमर आल्या. (neena gupta viv richards)

दरम्यान नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मसाबा मसाबा' सीरिजचा दुसरा सीजन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. तेव्हा नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टींचा खुलासा केला. (neena gupta interview)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

यावेळी नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील बोलल्या. त्या म्हणाल्या 'आपण ज्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करतो त्याच्यावर आपण कधीही रागवत नाही. त्या व्यक्तीबद्दल द्वेष कसा असू शकतो?' (neena gupta autobiography)

नीना पुढे म्हणाल्या, 'मला ते आवडत नसते तर मी त्यांच्या बाळाला जन्म का दिला असता.' एवढंच नाही तर यावेळी नीना यांनी मसाबाचं तिच्या वडिलांसोबत असलेल्या नात्यावर देखील स्पष्टिकरण दिलं. (Masaba - Masaba)

त्या म्हणाल्या, 'मसाबा आणि तिच्या वडिलांचं नात फार घट्ट आहे. त्या दोघांच्या नात्यात मी कधीही कडवटपणा आणला नाही. मसाबाला मी कायम तिचे निर्णय घेण्याची सूट दिली आहे..' असं देखील नीना म्हणाल्या. 

 नीना गुप्ता या क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत होत्या. गेल्या काही दिवसांपासून नीना त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात आहेत. नीना गुप्ता अनेक सिनेमे आणि वेब सीरिजमाध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या.

त्या 'पंचायत', '83', 'डायल 100', 'शुभ मंगल ज्यादा सावधान', 'पंगा',  'बधाई हो' आणि 'मुल्‍कसह' इतर सिनेमांमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू चाहत्यांना दाखवली.