Family Photo तून आलिया क्रॉप, नीतू कपूर यांच्या 'त्या' पोस्टमुळे खळबळ

कपूर Family Photo तून आलिया भट्ट कपूर क्रॉप, व्हायरल फोटोमुळे सर्वत्र चर्चांना उधाण   

Updated: Jun 27, 2022, 10:44 AM IST
Family Photo तून आलिया क्रॉप, नीतू कपूर यांच्या 'त्या' पोस्टमुळे खळबळ title=

मुंबई :  अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नानंतर सर्वत्र दोघांच्या नात्याची आणि लग्नाच्या फोटोंची चर्चा सुरु होती. पण लग्नाच्या 2 महिन्यांनंतर एक असा फोटो समोर आला आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक Family Photo पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'From Reel to Real world !! My loves' असं लिहिलं आहे. 

सध्या नीतू कपूर यांची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये नीतू यांच्यासोबत मुलगा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि ऋद्धिमा (Riddhima Sahni) दिसत आहे. फोटोवर लक्ष केंद्रीत केलं तर नीतू यांनी आलियाला क्रॉप केल असल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नीतू कपूर यांनी फोटोतून आलियाला क्रॉप केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या पोस्टवर ऋद्धिमाने देखील कमेंट केली आहे. फोटोवर सून आलियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

नीतू कपूर यांनी पुन्हा केली करिअरला सुरुवात
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री नीतू  कपूर  यांनी पुन्हा अभिनयाला सुरुवात केली आहे. नुकताचं नीतू यांचा ‘जुग जुग जीयो’ (Jugjugg Jeeyo)सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे. 

‘जुग जुग जीयो’ (Jugjugg Jeeyo) सिनेमाच्या यशानंतर नीतू कपूर यांनी मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.