नेहा धूपियाने ब्रेस्टफीडिंगचा फोटो शेअर करत ट्रोर्ल्सला दिलं सडेतोड उत्तर

स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते नेहा धूपिया 

Updated: Apr 27, 2021, 09:22 AM IST
नेहा धूपियाने ब्रेस्टफीडिंगचा फोटो शेअर करत ट्रोर्ल्सला दिलं सडेतोड उत्तर

मुंबई : नेहा धूपिया ही बॉलिवूडची सर्वात सडेतोड उत्तर देणारी अशी अभिनेत्री आहे. नेहा सोशल मीडियावर अनेक समस्यांवर मोकळेपणाने बोलताना दिसते. यावेळी नेहाने ब्रेस्टफीडिंगचा व्हिडिओ मागणाऱ्या व्यक्तीने चांगलाच क्लास घेतला आहे. एका महिलेकडे एक व्यक्ती ब्रेस्टफीडिंग करण्याचा व्हिडिओ मागत होता. नेहाला ही गोष्ट काही रुचली नाही. तिने चक्क मुलगी मेहरचा दूध पाजतानाचा फोटो तर शेअर केला सोबतच ट्रोलला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

नेहाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. मी अशा पद्धतीच्या कमेंटकडे दुर्लक्ष करते किंवा डिलीट केली. मात्र मला ही गोष्ट सगळ्यांसमोर आणावी असं वाटतं. अशा मानसिकतेचे लोक ब्रेस्टफीडिंगची परिस्थिती खूप चुकीच्या पद्धतीने घेतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

फोटो सोबतच नेहाने ब्रेस्टफीडिंगबाबत सविस्तर लिहिलं आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, नव्या आईचा प्रवास काय करतो असतो ती एक आईच समजू शकते. एकाबाजूला आई होण्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला नव्या जबाबदाऱ्या. आई होणं खूप कठीण असतं. या परिस्थितीत त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. मी देखील या परिस्थितीतून गेली आहे. हे फक्त आईवरच असतं की, तिला तिच्या बाळाला कुठे दूध पाजायचं आहे. मात्र आजही ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या आईला चुकीच्या नजरेने पाहतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नेहा पुढे म्हणते की, मी जेव्हापासून आई झालेय तेव्हा पासून मी सार्वजनिक ठिकाणी दूध पाजण्याला प्राधान्य दिलं आहे. या गोष्टीबाबत सर्वांनी संवेदनशील होण्याची गरज आहे.