नेहा कक्कड आणि बॉयफ्रेंड हिमांश यांच्या नात्यात अंतर

काय आहे हे नेमकं प्रकरण? 

नेहा कक्कड आणि बॉयफ्रेंड हिमांश यांच्या नात्यात अंतर

मुंबई : 'यारिया' सिनेमातील अभिनेता हिमांश कोहली आणि गायिका नेहा कक्कड यांच्या नात्यात काही आलबेल नसल्याच समोर येत आहे. या दोघांनी आपल्या नात्याबद्दल एका रिअॅलिटी शोमध्ये कबुली केली आहे. मात्र आता काही वेगळीच चर्चा समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नेहा आणि हिमांश यांनी इंस्टाग्राम एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तसेच त्यांनी एकमेकांचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kuch feelings ko bataane ki zarurat nahi padti, woh bas aankhon mein dikh jaati hai.. What I said is nothing compared to what I feel! Thank you #IndianIdol for a chance to tell this to the world!!  @nehakakkar . Watch Indian Idol This Sunday 8 pm. Only on @sonytvofficial . Song: #OhHumsafar by @tonykakkar #NehaKakkar #TonyKakkar #HimanshKohli #IndianIdol10

A post shared by Himansh Kohli (@kohlihimansh) on

तर दुसरीकडे हिमांशच्या अकाऊंटमध्ये नेहा आणि तिचे कुटुंबियांचे फोटो देखील दिसत आहेत. नेहाने हिमांशसोबत शेवटचा फोटो 7 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता. मात्र आता या दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे हे अद्याप कळलेलं नाही. 

नेहा आणि हिमांश यांचा 'ओह हमसफर' या गाण्यातून हे दोघं प्रेक्षकांसमोर आले. हा व्हिडिओ प्रेक्षकांनी खूप पसंत केला होता. पण आता या दोघांमध्ये काही तरी खटके उठत असल्याचं समोर आलं आहे. 

महत्वाचं भाग म्हणजे 'इंडियन आयडॉल' 10 मध्ये 'शादी स्पेशल' भागात नेहा कक्कड परिक्षक म्हणून होती तेव्हा तिला सुखद धक्का देण्यासाठी हिमांशला आमंत्रित केले होते. आपल्या जवळच्या खास व्यक्तीला बघून नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता. पण आता त्यांच्यात नेमकं काय झालं याचा खुलासा होत नाही.