विवेक यांच्या निधनानंतर विवेक ऑबेरॉयने सांगितलं सत्य; म्हणाला...

अभिनेता विवेक यांचं चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात शनिवारी सकाळी निधन झालं.

Updated: Apr 17, 2021, 08:34 PM IST
विवेक यांच्या निधनानंतर विवेक ऑबेरॉयने सांगितलं सत्य; म्हणाला...

मुंबई : लोकप्रिय तामिळ अभिनेता विवेक यांचं चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात शनिवारी सकाळी निधन झालं. त्यामुळे सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या चाहत्यांना देखील दुःख अनावर झालं. याच दरम्यान अनेक अफवा देखील पसरल्या. त्यानंतर अभिनेता विवेक ऑबेरॉयची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. विवेकला चेन्नईच्या सिम्स रूग्णालयात दाखल केलं असल्याचं सांगितलं जात होत. पण या निव्वळ अफवा असल्याचं खुद्द विवेकने सांगितलं आहे. 

विवेक ट्विट करत म्हणाला की, 'चेन्नईत  मी रूग्णालयात असल्याची माहिती खोटी आहे. मी माझ्या कुटुंबासोबत सुरक्षित आणि स्वस्थ आहे. मी मुंबईत आहे. तामिळ अभिनेता विवेक यांच्या निधनाने मला देखील मोठा धक्का बसला, ईश्वर त्यांच्या कुटुंबाला धैर्य देवो..' असं देखील विवेकने लिहिलं आहे. 

दरम्यान,  पहाटे 4.35 च्या सुमारास अभिनेता विवेक यांची प्राणज्योत मालवली. (Vivek, Tamil film actor, dies in Chennai hospital)  शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. वयाच्या 59 व्या वर्षी कॉमेडी अभिनेत्याने गुरूवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती.