close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शाहरुखच्या 'बार्ड ऑफ ब्लड' वेबसीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

पाहा 'बार्ड ऑफ ब्लड'चा ट्रेलर

Updated: Aug 22, 2019, 09:12 PM IST
शाहरुखच्या 'बार्ड ऑफ ब्लड' वेबसीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून नेटफ्लिक्सवर शाहरुखच्या बहुप्रतिक्षित 'बार्ड ऑफ ब्लड' वेबसीरिजची चर्चा होती. अखेर बहुचर्चित 'बार्ड ऑफ ब्लड'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'बार्ड ऑफ ब्लड'मध्ये अभिनेता इम्रान हाशमीने प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजमधून इम्रानने वेबवर्ल्डमध्ये एन्ट्री केली आहे. 

'बार्ड ऑफ ब्लड'च्या 2 मिनिटं 20 सेकंदाच्या या धमाकेदार ट्रेलरने या सीरिजबाबत कमालीची उत्सुकता वाढवली आहे. इम्रानने कबीर आनंद नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. भारताचे 4 गुप्तहेर पाकिस्तानात पडकण्यात आल्यानंतर कबीर उर्फ एडोनिसला आणखी 2 लोकांसोबत सीक्रेट मिशनवर पाठवण्यात येतं. याच मोहिमेबाबत ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहे. 'बार्ड ऑफ ब्लड'मध्ये इम्रानव्यतिरिक्त शोभिता धूलिपाला, विनित कुमार सिंह, रजित कपूर, जयदीप हे कलाकारही भूमिका साकारत आहेत. 

'बार्ड ऑफ ब्लड' ही वेबसीरीज लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या 'बार्ड ऑफ ब्लड' या पुस्तकावर आधारित आहे. 'किंग खान' शाहरुखच्या रेडचिलीजने वेबसीरीजची निर्मिती केली आहे. 'बार्ड ऑफ ब्लड' येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.