'मेरे सैंया सुपरस्टार..' गाण्यावर ठेका धरणाऱ्या नवरीचा नवा डान्स

श्वेताने स्वतः नवरी असताना केलेल्या डान्सचे अनेकांनी कौतुक केले होते. 

Updated: May 22, 2021, 08:57 PM IST
'मेरे सैंया सुपरस्टार..' गाण्यावर ठेका धरणाऱ्या नवरीचा नवा डान्स  title=

मुंबई : अनेक लग्नांमध्ये नवरी मुलगी लाजते, पण या नवरीने मांडव गाजवला. आता देखील त्या नवरीचा नवा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या नवरीचं नाव आहे श्वेता शिंदे. सध्या श्वेताचा “सोडा सोडा राया” या गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत असून त्याच्या गाण्यावर केलेल्या डान्स व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. श्वेता कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. शिवाय सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

30 नोव्हेंबर रोजी श्वेता स्वतःच्या लग्नात 'मेरे सैंया सुपरस्टार' गाण्यावर ठेका धरत लग्न मंडपात एन्ट्री केली. एका एन्ट्रीनं श्वेताला रातोरात लोकप्रियता मिळाली. तिचा लग्नातील डान्स तुफान व्हायरल झाला होता. तेव्हा तिने तिच्या पतीसाठी डान्स केला होता. श्वेताने स्वतः नवरी असताना केलेल्या डान्सचे अनेकांनी कौतुक केले होते.