2018 मध्ये बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसणार या नव्या जोड्या

बॉलिवूडमध्ये अनेक नवीन नवीन कलाकार येत आहेत. हल्ली प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये नवे चेहरे आणि नव्या जोड्या पाहणे जास्त आवडतं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 13, 2018, 05:37 PM IST
2018 मध्ये बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसणार या नव्या जोड्या title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक नवीन नवीन कलाकार येत आहेत. हल्ली प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये नवे चेहरे आणि नव्या जोड्या पाहणे जास्त आवडतं.

2018 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांना अनेक नव्या जोड्या पाहायला मिळणार आहेत. कोणत्या असतील या नवीन जोड्या पाहा.

1. पद्मावत : यामध्ये शाहीद कपूर आणि दीपिका पदुकोणची जोडी दिसणार

2. सुई धागा- मेन ईन इंडिया : यामध्ये वरूण धवन आणि अनुष्का शर्माची जोडी दिसणार

3. गोल्ड : यामध्ये टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय अक्षय कुमार सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार 

4. साहो : यामध्ये बाहुबली फेम प्रभास अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबत दिसणार

5. गली बॉय : यामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची जोडी पाहायला मिळणार 

6. फन्ने खान : यामध्ये ऐश्वर्या राय आणि राजकुमार राव यांची जोडी पाहायला मिळणार

7. ड्राईव्ह : यामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलीन फर्नांडीसची जोडी पाहायला मिळणार 

8. राजी : यामध्ये आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांची जोडी दिसणार 

9. अक्तूबर : यामध्ये वरूण धवन आणि बनिता संधू यांची जोडी दिसणार 

10. पॅड मॅन : यामध्ये अक्षय कुमार आणि राधिका आपटे यांची जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार