'जय मम्मी दी'मधील नवं गाणं प्रदर्शित

मम्मीला पसंत नाही मुलीचा बॉयफ्रेंड

Updated: Dec 18, 2019, 02:19 PM IST
'जय मम्मी दी'मधील नवं गाणं प्रदर्शित  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या Recreating चा काळ सुरू आहे. अभिनेता सनी सिंग आणि अभिनेत्री सोनाली सेयगल स्टारर 'जय मम्मी दी' चित्रपटाचं नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'मेरी मम्मी नू...' हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गाण्याला तरूणांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. हे गाणं प्रत्येकाला ताल धरायला लावेल असंच आहे. 

गेल्या वर्षी हे गाणं गायिका सुनंदा शर्मा यांच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आलं होतं. आता लव रंजन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी 'मेरे मम्मी नू..' गाण्याची निवड केली. शिवाय हे गाणं चित्रपटासाठी अगदी योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

गायिका तनिष्का बागचीने गाण्याला रिक्रिएट केलं आहे. जानी लिखीत या गाण्याला सुख ईने संगीत दिले आहे. 'मेरे मम्मी नू..' गाण्यां चित्रीकरण गाजियाबादमध्ये करण्यात आलं आहे. गाण्याचं नृत्य दिग्दर्शन आदिल शेखने केलं आहे.

मूळ पंजाबी असलेल्या या गाण्याला हिंदी टच देण्यात आला आहे. 'मेरे मम्मी नू..' गाणं मंगळवारी प्रदर्शित करण्यात आलं. आता पर्यंत या गाण्याला तब्बल २८ लाख ९४ लाखपेक्षा जास्त चाहत्यांनी हे गाणं पाहिलं आहे. 

'जाय मम्मी दी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जाबाबदारी नवज्योत गुलाटी यांच्या खांद्यावर आहे. टी सीरिजचे भूषण कुमार, लव रंजन आणि अंकुर गर्गकृष्ण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली. 'जय मम्मी दी' १७ जानेवारी २०२० मध्ये रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.