'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत आणखी एक ट्विस्ट

नव्या वेळेत मालिका भेटीला 

Updated: Oct 25, 2019, 11:27 AM IST
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत आणखी एक ट्विस्ट

मुंबई : झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. मालिका सध्या एका नव्या वळणावर आहे. नंदिता वहिणीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आता गायकवाड कुटुंबाने आनंदाने राहण्याचा विचार करत आहेत. मात्र राणाच्या मनात काहीतरी सल आहेच. ती सल कोणती किंवा राणा आता पुढे नेमकं काय करणार? याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून राहिलं आहे. 

मालिकेला वेगळं वळण 

या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता त्यांचा लाडका राणा पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षक राणाला या हटके लूकमध्ये पाहू शकतील. राणाने नोकरी किंवा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करण्याचं ठरलंआहे आणि अंजली देखील त्याच्या या निर्णयात त्याला साथ देणार आहे. राणा त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करतो आणि नोकरीच्या शोधात असलेल्या राणाला स्पोर्ट्स कोट्यातून पोलीस भरतीची माहिती कळते. राणा तिथे भरती होऊन ट्रेनिंग घेणार आहे. या मालिकेतील त्याच्या या नव्या बदला बद्दल बोलताना राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "तुझ्यात जीव रंगला या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे आणि म्हणूनच राणा पोलिसमध्ये भरती व्हायचा निर्णय घेतो. प्रेक्षकांनी जसं राणावर प्रेम केलं तसंच राणाचा हा नवीन प्रवास देखील पाहायण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील."

हार्दिकने मालिकेत सुरूवातीला साधा, भोळा भाबडा राणा दा म्हणजे रणविजय गायकवाडची भूमिका साकारली. त्यानंतर राणा- राजा राजगोंडा म्हणून प्रेक्षकांच्या समोर आला. राजा राजगोंडाने त्याच्या कुटुंबाला आणि गावाला त्रास देणाऱ्या नंदिता वहिनीचा समाचार घेतला. त्यानंतर आता राणी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.