वटपौर्णिमा विशेष : 'या' नवविवाहीत अभिनेत्रींनी साजरी केली पहिली वटपौर्णिमा

दुबईत वटवृक्ष नसल्याने वटपौर्णिमा साजरी करता आली नसल्याचे सोनाली कुलकर्णीने कॅप्शनमध्ये म्हटलं..

Updated: Jun 24, 2021, 09:40 PM IST
वटपौर्णिमा विशेष : 'या' नवविवाहीत अभिनेत्रींनी साजरी केली पहिली वटपौर्णिमा

मुंबई : हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेच व्रत करतात. वडाची पुजा करुन उपवास करुन पतीबाबतच आपलं प्रेम व्यक्त करतात. यंदा अनेक नवविवाहीत मराठी अभिनेत्रींनीही वटपौर्णिमेचं व्रत केलं आहे. 2020 आणि 2021 च्या सुरुवातीला अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी विवाहगाठ बांधली.. त्यामुळे ही पहिली वटपुजा या अभिनेत्रींसाठी खूपच खास होती.. पारंपारिक पेहराव करत साजश्रृंगार करत अभिनेत्रींनी हाच पती जन्मोजन्मी मिळो यासाठी वडाच्या झाडाची पुजा केली. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीने 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्न केलं. त्यामुळे सोनालीनेही खास पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय.. "आज वटपौर्णिमा.. माझी पहिलीच, जरी साजरा करता येत नसली तरी….जरा नटावं म्हणलं… बाकी नवऱ्याला उत्तम, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना ! कुणालाला देखील वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
सोबतच तिने दुबईत वटवृक्ष नसल्याने वटपौर्णिमा साजरी करता आली नसल्याचे ही कॅप्शनमध्ये म्हटलं..

अभिनेत्री रुचिता जाधवची देखील ही पहिलीच वटपौर्णिमा होती.. 3 मे रोजी उद्योगपती आनंद मानेसोबत तिने पाचगणी येथे काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात बांधली. वटपुजा करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाये

अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईकने 2021 च्या सुरुवातीला इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासोबत विवाह केला आणि खरेरांच्या घरात एन्ट्री घेत सुखी संसाराला सुरुवात केली, त्यामुळे यंदा मानसीचीही ही पहिली वटपौर्णिमा होती. मानसीने हिरव्या रंगाची साडी आणि गोल्डन ज्वेलरी असा मराठमोळा लूक करत वटपौर्णिमा साजरी केली..