ट्रान्सपरंट कपड्यात फोटोशूट करणं अभिनेत्रीला पडलं महागात

 अभिनेत्री निया तिच्या बोल्ड फॅशनमुळे अनेकदा प्रसिद्धी झोकात असते.

Updated: Sep 24, 2021, 07:56 PM IST
ट्रान्सपरंट कपड्यात फोटोशूट करणं अभिनेत्रीला पडलं महागात

मुंबई : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड फॅशनमुळे अनेकदा प्रसिद्धी झोकात असते. तिच्या हॉट लूक आणि सेक्सी स्टाईलसाठी चाहते वेडे आहेत. यामुळेच अभिनेत्रीचे ग्लॅमरस लूक काही मिनिटांतच व्हायरल होतात. नियाची स्टाईल सेन्स इतकी अभिजात आणि ट्रेंडी आहे की, तिच्या फोटोंवरुन डोळेच हटत नाहीत. असाच एक लुक अलीकडेच व्हायरल होत आहे. ज्यात निया ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसत आहे.

ट्रान्सपरंट टॉपमध्ये निया शर्मा
नियाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली आहेत. ज्यात ती पांढऱ्या टॉपसोबत काळ्या शॉर्टमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने घातलेला क्रॉप टॉप नेट फॅब्रिक वापरून बनवला होता. या टॉपवर कट वर्कसोबतच हँन्ड एम्ब्रॅायडरी केली गेली होती, ज्यामुळे बे पहायला हलकं दिसत होतं. जरी नियाने त्याच्या आत एक ब्रलेट टॉप घातला होता.

फज-फ्री स्टाईल 
नियाच्या या टॉपमध्ये, राउंड नेकलाइनसोबत बॅल स्लीव्सदेण्यात आले आहेत. ज्यात मॅचिंग एम्ब्रॉयडरी आणि लेस वर्कही करण्यात आलं आहे. तिचा शॉर्ट टॉप ब्लॅक मायक्रो मिनी शॉर्ट्सोबत घातला आहे. ज्यामध्ये तिने स्टाईलचा भाग वाढवण्यासाठी बेल्टच्या जागी चांदीची साखळीचा वापर केला आहे. अनेकांनी जरी नियाच्या या फोटोशूटचं कौतूक केलं असलं तरी अनेकांनी तिला ट्रोल करत सुनावलं आहे. त्यामुळे ही फॅशन तिला महागात पडत आहे.