Kiara Advani सोबत लग्नाच्या प्रश्नावर अखेर Sidharth ने उघले तोंड, म्हणाला....

सिद्धार्थ मल्होत्राने नुकत्याच रिलीज झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. 

Bollywood Life | Updated: Sep 24, 2021, 07:52 PM IST
Kiara Advani सोबत लग्नाच्या प्रश्नावर अखेर Sidharth ने उघले तोंड, म्हणाला....

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने नुकत्याच रिलीज झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. या चित्रपटात अभिनेत्याच्या आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्याने 1999 च्या कारगिल युद्धातील कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra)  यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासह कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. कियारा हिने डिंपल चीमा म्हणजेच कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.

गेल्या काही काळापासून अशी चर्चा आहे की, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे एकमेकांना डेट करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राने त्यांच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल खुलासा केला. सिद्धार्थ मल्होत्राने कियारा अडवाणीशी लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आपलं वक्तव्य दिलं आहे.

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सिद्धार्थला विचारण्यात आले की, तो लग्न कधी करणार आहे? त्यावर अभिनेत्याने उत्तर दिले, "मला याबद्दल कल्पना नाही. मी काही ज्योतिषी नाही. मला माहित नाही की, हे कोणासाठी हे जास्त महत्वाचे आहे. जेव्हा ते होईल तेव्हा मी सर्वांना कळवीन."

सिदार्थ पुढे म्हणाला, 'मला माहित नाही. माझ्यासाठी अशी कोणतीही टाइमलाइन नाही. मला वाटते की लग्न योग्यरित्या केले पाहिजे. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईने घेणे योग्य ठरणार नाही."

सिद्धार्थ मल्होत्रा​त्याच्या शेरशाह चित्रपटाची सह-कलाकार आणि कथित गर्लफ्रेंड कियारा अडवाणीबद्दल देखील बोलला. अभिनेत्याने कियाराबद्दल एक गोष्ट शेअर केली जी त्याला आवडली आणि आवडली नाही.

तसेच सिद्धार्थने कियारा आणि तिच्यासोबत एका लव्ह स्टोरी प्रोजेक्टवर काम करण्याच्या कल्पनेवरही खोचकपणे प्रतिक्रिया दिली.