निया शर्माने भररस्त्यात गाडी थांबवून केला 'हा' प्रकार

 सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

Updated: Mar 8, 2021, 12:05 PM IST
निया शर्माने भररस्त्यात गाडी थांबवून केला 'हा' प्रकार

मुंबई : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma)  सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. निया शर्मा तिच्या चाहत्यांसाठी काहीना काहीतरी घेऊन येत असते. म्हणूनच तिची प्रत्येक पोस्ट लवकर व्हायरल होते. निया शर्माने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

रस्त्यामध्ये गाडी थांबवून डान्स

निया शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मध्यरात्री  अचानक गाडी थांबवते आणि रस्त्यावर डान्स करते. तिची एक मैत्रिण  सोबत आहे. निया शर्माच्या या व्हिडिओने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि ते खूप कौतुकही करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

या अगोदर देखील व्हिडिओ व्हायरल

यापूर्वी निया शर्माने इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये पळत समुद्राच्या किनाऱ्यावर धावताना दिसली होती. या व्हिडिओमध्ये निया समुद्रकिनारी आपल्या अदा दाखवते. निया शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

नियाचं काम चर्चेत 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर निया शर्मा शेवटच्या वेळी 'नागीन ४' मध्ये जस्मीन भसीन,रश्मी देसाई आणि विजेंद्र कुमेरियासोबत दिसली होती. या कार्यक्रमात निया शर्माने इच्छाधारी नागिनची भूमिका केली होती. तसेच नियाने 'खतरों के खिलाड़ी: मेड इन इंडिया' ही ट्रॉफी मिळवली होती. रिपोर्ट्सनुसार निया लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. पण तिने अद्याप आपला नवीन प्रोजेक्टविषयी सांगितले नाही. तिच्या स्टाईलसाठी निया शर्माला आशियातील तिसर्‍या मोस्ट सेक्सी वुमनचे नावही मिळाले आहे. त्याच नियाच्या 'ट्विस्टेड' या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.