प्रियांकाच्या देसी सौंदर्यावर निकची प्रतिक्रिया

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान प्रियांकाचा देसी लूक चांगलाच व्हायरल होत आहे. 

Updated: Sep 29, 2019, 04:55 PM IST
प्रियांकाच्या देसी सौंदर्यावर निकची प्रतिक्रिया  title=

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. लग्नानंतर तिचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. चित्रपटात ती त्याचप्रमाणे अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री झायरा वसीम मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान प्रियांकाचा देसी लूक चांगलाच व्हायरल होत आहे. फक्त चाहत्यांकडून नाही तर पती निकने सुद्धा तिच्या देसीलूकचं कौतुक केलं आहे. 

खुद्द निकने त्याच्या सोशल मीडियावर प्रियांकाचा फोटो शेअर करत फोटोला 'Wow'असे कॅप्शन दिले आहे. नुकताच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या भविष्याच्या प्लॅनिंग बद्दल खुलासा केला. 'सध्या मी घर शोधत आहे. त्यानंतर मुलांना जन्म देणार आहे. माझं मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये घर आहे. पण लॉज एंजेलिस माझ्यासाठी एक पर्याय आहे.' असं ती म्हणाली आहे. 

'द स्काय इज पिंक' शिवाय क्रिस पॅट्सच्या 'Cowboy Ninja Viking' या चित्रपटात प्रियंका दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूड्चे अनेक प्रोजेक्टस देखील आहेत. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील झळकणार आहेत. 'द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोबरमध्ये रूपेरी पडद्यावर होणार आहे.