निक्यांकाच्या हळदीचे फो़टो व्हायरल

नवीन जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Updated: Jan 26, 2019, 04:24 PM IST
निक्यांकाच्या हळदीचे फो़टो व्हायरल title=

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि गायक निक जॉनस हे जोडपे  २ डिसेंबर २०१८ रोजी विवाह बंधनात अडकले. हा शाही विवाह सोहळा उमेद भवन जोधपूर येथे संपन्न झाला. विवाह दोन पद्धतीत साजरा करण्यात आला. ख्रिश्चन विवाह पद्धतीत आणि हिंदू विवाह पद्धतीत निक्यांका यांचा विवाह सोहळा पार पडला. फोटोमध्ये प्रियंका नवरीच्या रुपात फार छान दिसत आहे. या नवीन जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर प्रियंका आणि निक यांचे चाहतेही फार मोठ्या प्रमाणात जगभरात आहेत. प्रियंका आणि निक यांच्या हळदीचे काही दृश्य

या फोटोमध्ये प्रियंका आणि निक यांना हळद लावली आहे. प्रियंकाचे हास्य तिच्या सैंदर्यावर आणखी भर घालत आहे. 

 

 

 

 

 

४ डिसेंबर २०१८ रोजी निक्यांका यांनी दिल्लीमध्ये एक भव्य स्वागत सोहळा आयोजीत केला होता. हा  स्वागत सोहळा मुख्यत: प्रमुख पाहुणे, नातेवाईक, प्रसारमाध्य़म त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अयोजीत करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत सोहळ्यात उपस्थित राहून वधू-वरास आशिर्वाद दिले.   

अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणवीर यांच्याप्रमाणेच निक्यांका यांनी दोन स्वगत सोहळे आयोजीत केले. दिल्ली आणि मुंबई येथे स्वगत सोहळे संपन्न झाले. अनेक मित्रमंडळींही निक्यांक यांच्या आनंदात सहभागी झाले.