सोशल मीडियावर ट्रोल होणं हे निक्की तांबोळीसाठी तसं काही नवं नाही. पण नुकतंच जेव्हा तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला तेव्हा मात्र तिला ट्रोल करताना काहीजणांना पातळी ओलांडली. तिच्या फोटोवर अनेकांनी आक्षेप दर्शवला तसंच ट्रोलही केलं. यावेळी काहींनी तर तिला पॉर्न स्टारही म्हटलं. पण निक्की तांबोळीने ही टीका फार गांभीर्याने घेतली नाही. पण यावेळी तिने शांत बसणंही ठरवलं नाही चोख उत्तर दिलं. आपल्याला बाहेरील लोकांच्या वैध्यतेची गरज नाही असं सांगत तिने टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
पॉर्न स्टार म्हणणाऱ्यांना उत्तर देताना निक्की तांबोळीने म्हटलं आहे की, "तुम्ही मला काहीही बोलू शकता आणि त्यामुळे माझ्या स्थैर्यतेला अजिबात धक्का लागत नाही. मला माझ्या कामासाठी बाहेरच्या लोकांच्या वैध्यतेची गरज नाही ज्यांचं काम फक्त सोशल मीडियावर वेळ घालवत काहीतरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ट्रोल करणं आहे".
सोशल मीडियावर घाणेरड्या कमेंट करणाऱ्यांचा उल्लेख करत 26 वर्षीय निक्की तांबोळीने सांगितलं की “माझी किंवा इतर कोणाचीही अॅडल्ट फिल्म स्टारशी तुलना करणे हा त्या महिलांचा अपमान आहे. विनाकारण दुसर्या स्त्रीच्या नावाखाली दुसऱ्या स्त्रीला का हिणवायचे? हे तेच भयंकर लोक नाहीत का जे त्यांच्या वासनांध डोळ्यांनी अॅडल्ट चित्रपटांचा आनंद घेतात? एक अॅडल्ट चित्रपट स्टारदेखील आदरास पात्र आहे.”
दरम्यान आपण अशा कमेंट्सवर व्यक्त का होत नाही याचं कारणही निक्की तांबोळीने सांगितलं आहे. ती म्हणाली की “तुम्ही जितके जास्त व्यक्त होता तितके हे ट्रोल तुमच्यावर वैयक्तिक पातळीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. तथापि, जेव्हा त्यांना हे समजते की हे फक्त एकतर्फी आहे तेव्हा आज किंवा उद्या त्यांना कंटाळवाणं आणि थकल्यासारखं वाटू शकते व ते कमेंट करणं थांबवू शकतात. कोणत्याही प्रकारे, ते माझे चांगलं जीवन थांबवू शकत नाहीत".
बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेल्या निक्की तांबोळीला कार्यक्रमात असतानाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण या ऑनलाइन ट्रोलिंगसंबंधी तिची भूमिका स्पष्ट आहे. "मी कोणत्याही ट्रोल करणाऱ्याला किंवा द्वेष करणाऱ्याला मला खाली खेचण्याची संधी दिलेली नाही. ते त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करु शकतात पण फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेईन. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. माझ्या भावाच्या निधनानंतरही मी परदेशात जाऊन काम केलं होतं. कारण माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे. असे छोटे ट्रोलर्स आयुष्यातील मोठ्या ध्येयापुढे टिकत नाहीत," असं तिने सांगितलं आहे.
दरम्यान निक्की तांबोळीने यावेळी काही लोकांना अशा कमेंट्सचा फरक पडतो आणि त्यांची मानसिक स्थिती यामुळे खचली जाते हेदेखील मान्य केलं आहे. "तुम्ही काय प्रासंगिक आहे आणि काय लक्ष देण्यास पात्र नाही यात फरक केला पाहिजे. तितकं तुम्ही स्वत:ला तयार केलं पाहिजे. लोक काय म्हणतात याची पर्वा करु नका, आपली ओळख निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे स्थान तयार करण्यासाठी येथे आहे हे लक्षात ठेवा. माझ्याकडे अशी फिल्मी पार्श्वभूमी नाही जी मला घरीबसल्या काम मिळवून देईल. मी माझा स्वतःचा प्रवास तयार करण्यासाठी येथे आले आहे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी इतके काही आहे की कधीकधी, दिवसातील 24 तास देखील कमी असतात. माझ्या वैयक्तिक वाढीसाठी आणि विकासात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी मी नाही. आणि हा साधा विचार मला माझे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतो,” असं ती सांगते.