अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान निमरत कौरने कन्फर्म केलं रिलेशनशिप स्टेटस, म्हणाली 'मी...'

अभिषेक बच्चनसोबत अफेअर असल्याच्या चर्चांमुळे बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौरने अप्रत्यक्षपणे आपल्या रिलेशनशिपचं स्टेटस सांगितलं आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 8, 2024, 12:51 PM IST
अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान निमरत कौरने कन्फर्म केलं रिलेशनशिप स्टेटस, म्हणाली 'मी...'

बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौर गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. असं म्हटलं जातं की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यामध्ये दुरावा येण्याचं कारण आहे अभिनेत्री निमरत कौर. अभिनेत्री नुकतीच 'सिटाडेल हनी बनी' च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने अप्रत्यक्ष रित्या आपल्या रिलेशनशिप स्टेटसबाबत माहिती दिली. ज्यानंतर चाहते त्यावर प्रतिक्रिया देताना दिसते. 

Add Zee News as a Preferred Source

'झूम'मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या सिंगल असण्यावर सहमती दर्शवली. ज्यामुळे अनेक लोकांना ती सिंगल असल्याचं अधिकृतपणे सांगितलं. या विषयावर निरमित कौर न बोलणेच पसंत केले आहे. पण या दरम्यान तिने सिंगल मुलींना मोलाचे सल्ले दिले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

याआधी, काही सूत्रांनी दावा केला आहे की, बच्चन कुटुंबाने या अफवा फेटाळून लावल्या आहेत आणि म्हटले आहे की, “या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही.” तर असेही म्हटले जात होते की, अभिषेक बच्चनने या प्रकरणात मौन बाळगण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला यावेळी वादापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, निमरत कौरने अद्याप याप्रकरणी आपली बाजू मांडलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एका बिग फॅट वेडिंगमध्ये बच्चन कुटूंबीय आणि ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत वेगवेगळे आले. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. तसेच अनेक कार्यक्रमात त्यांना वेगवेगळं देखील पाहण्यात आलं आहे. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More