‘वाजले की बारा’ गाण्यावर अमृता खानविलकरसह थिरकली Nora Fatehi

'लावणी करायलाच लावली पोरीला...',  नोरा फतेहीने लावणीवर धरला ठेका, पाहा Video  

Updated: Sep 29, 2022, 03:57 PM IST
‘वाजले की बारा’ गाण्यावर अमृता खानविलकरसह थिरकली Nora Fatehi title=

Nora Fatehi dance on lavani : अभिनेत्री अमृता खानविलकरचं (Amruta Khanvilkar) सौंदर्य आणि डान्स प्रत्येकाला माहिती आहे. कोणत्याही प्रकारच्या नृत्याचं प्रशिक्षण न घेता अमृताने नृत्याच्या कलाविश्वात स्वतःचं वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. ‘वाजले की बारा’ या गाण्यानंतर अमृताला एक नवी ओळख मिळाली. आजही कोणताही कार्यक्रम असला की ‘वाजले की बारा’ लावणीवर डान्स होतोचं...

‘वाजले की बारा’ लावणीची जादू फक्त चाहत्यांच्याच मनात नाही, तर सेलिब्रिटींच्या मनात देखील आहे. सध्या अमृता आणि अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघींनी ‘वाजले की बारा’ लावणीवर ठेका धरला आहे. पाहा व्हिडीओ... (Nora Fatehi dance on lavani)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ पोस्ट करत अमृताने कॅप्शनमध्ये 'लावणी करायलाच लावली पोरीला...', असं लिहिलं आहे. सध्या दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

दरम्यान, अमृता आणि नोराचा व्हिडीओ ‘झलक दिखला जा’ शोच्या दहाव्या सीझनमधील आहे. यावेळी अमृताचा डान्स पाहून परीक्षत थक्क झाले. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, नोरा फतेही आणि दिग्दर्शक करण जोहर या शोमध्ये परिक्षक आहेत.