'या' गाण्यामुळे नोराला भारतात मिळाली प्रसिद्धी, नोरोचा पुन्हा 'या' गाण्यावर डान्स सादर

एका बाजूला ऑरेंज रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेही तर दुसरीकडे तुषार कालिया शर्टलेस. 

Updated: Jun 23, 2021, 06:20 PM IST
'या' गाण्यामुळे नोराला भारतात मिळाली प्रसिद्धी, नोरोचा पुन्हा 'या' गाण्यावर डान्स सादर

मुंबई : एका बाजूला ऑरेंज रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेही तर दुसरीकडे तुषार कालिया शर्टलेस. दोघंही डान्सचे महान बाप आहेत. दोघंही त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये माहिर आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा दोन माहिर लोक एकत्र स्टेजवर येतात, तेव्हा धमाकेदार परफॉर्मन्स होणारच याचा अंदाज लावणं ही चुकीची गोष्ट ठरणार नाही. जेव्हा नोरा फतेही आणि तुषार कालियाने डान्स दिवाना 3च्या सेटवर परफॉर्मन्स करायला सुरवात केली तेव्हा लोकांच्या हृदयाची धडधड वाढली, त्याचबरोबर त्यांचा हॉट डान्स पाहून गरमीही इतकी वाढली की सर्वांना घाम फुटू लागला

'साकी साकी' या गाण्याने नोरा फतेहीला प्रचंड प्रसिद्धी दिली आणि तिला भारतीय लोकांच्या मनावर राज्य करण्याचीही संधी दिली. आजही नोरा रिएलिटी शोचा भाग असो की चित्रपटाच्या इवेंन्टचा, तिला नेहमीच या गाण्यावर नाचण्याची विनंती केली जाते. अशा परिस्थितीत जेव्हा ती डान्स दिवानेच्या सेटवर पोहोचली तेव्हा तिने पुन्हा 'साकी-साकी' या गाण्यावर परफॉर्मन्स केला. पण यावेळी तिने हा परफॉर्मन्स  एकटीने सादर केला नाहीतर, तर यावेळी तिच्यासोबत  नृत्यदिग्दर्शक तुषार कालिया देखील होता.  दोघांनी एकत्र स्टेजवर धमाकेदार डान्स सादर केला.

एका परफॉर्मन्स मध्ये दोघंही एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसले, तर दुसऱ्या परफॉर्मन्स मध्ये दोघांनीही आपापल्या टीमसोबत आमनेसामने सामना केला. ईथे दोघांनी एकमेकांना हरवण्यासाठी पूर्ण ताकद लावली.

या आठवड्यात, रविना टंडन या शोमध्ये पाहुणी म्हणून येणार आहे. यावेळी स्पर्धक तिच्या हिट गाण्यांवर परफॉर्मन्स करताना दिसतील. रवीना टंडनला मस्त मस्त गर्ल म्हणून ओळखलं जातं. शोमध्ये पोहोचल्यानंतर रवीना तिच्या हिट गाण्यावरही एक डान्स सादर करताना दिसणार आहे.