कंबर लचकेपर्यंत नाचणारी ही अभिनेत्री मुंबईत फिरतेय बाईकवर

पावसाचा आनंद घेण्यासाठी नुकतीच एक बॉलिवूड अभिनेत्री मुंबईत बाईकवर फिरताना दिसली. 

Updated: Jul 18, 2021, 06:18 PM IST
कंबर लचकेपर्यंत नाचणारी ही अभिनेत्री मुंबईत फिरतेय बाईकवर title=

मुंबई : पावसाचा आनंद घेण्यासाठी नुकतीच एक बॉलिवूड अभिनेत्री मुंबईत बाईकवर फिरताना दिसली. पण अभिनेत्रीने यावेळी मास्क लावलेला असल्याने  तिला ओळखणं काहीसं कठीण होतं.आपल्या जबरदस्त डान्समुळे सगळ्यांचीच फेवरेट बनलेली अभिनेत्री नोरा फतेही मुंबईच्या रस्त्यावर पावसाचा आनंद घेताना दिसली.

 नोराने बाईकवर बसून पावसाचा आनंद घेतला. वर्सोवाच्या रस्त्यांवर फिरताना नोराने काळ्या रंगाचा मास्क लावला होता. त्यामुळे बाईकवर फिरत असताना तिला  ओळखणं काहीस कठीण होतं. त्याचाच फायदा घेत नोराने आपली बाईक राईट पूर्ण केली. 

नोराने यावेळी पांढऱ्या रंगाचे शॉर्ट्स आणि ब्लॅक टॉप असा कॅज्यूअल लूक केला होता. नोराचे बाईक राईटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकतीच 'डान्स दिवाने 3'च्या मंचावर नोराने गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. यावेळी ठुमके लगावत नोराने माधुरी दीक्षित सह उपस्थितांचं लक्षवेधून घेतलं.

नोरा तिच्या हटके स्टाईलिंगमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके आऊटफिटमुळे ती सगळ्यांचच लक्षवेधून घेत असते.