नोरा फतेहीला या व्यक्तीला करायचंय Kiss,पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

नोराने अद्याप आपली लव्ह लाईफ रिवील केलेली नाही.  

Updated: Jul 24, 2021, 05:33 PM IST
नोरा फतेहीला या व्यक्तीला करायचंय Kiss,पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या बोल्ड डान्ससाठी विशेष चर्चेत असते. त्यात तिच्या फॅशनची सर्वात जास्त चर्चा पाहायला मिळते. नोरा आपल्या हटके आऊटफिटमुळे देखील चाहत्यांचं लक्षवेधून घेताना दिसते.

नुकतंच नोराने वेगळा लूक करत खास फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये नोरा रेड कलरचा डिझाईनर ड्रेस घातला आहे. तिचा  हा लूकमुळे चाहेत पुन्हा एकदा नोराच्या प्रेमात पडले आहेत. पण नोराने मात्र आपल्या प्रेमाची आता कबुली दिली आहे.

नोराने दिली प्रेमाची कबुली 

नोराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले नवं फोटोज पोस्ट केलं आहेत. हे फोटो शेअर करत नोराने या फोटोखाली दिलेलं कॅप्शन खूपच चर्चेत आहे. नोराने कॅप्शनमध्ये लिहिलंय, I wanna kiss you, But if I do then I might miss you, babe..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

आता नोराला नक्की कोणला किस करायचं आहे हे तिने या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण या फोटोच्या कॅप्शनवरुन नोराने नाव न घेता त्या खास व्यक्तीला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे, अशी एकच चर्चा सध्या रंगतेय.

नोराने अद्याप आपली लव्ह लाईफ रिवील केलेली नाही, त्यामुळे तो लकी व्यक्ती कोण असेल याची चाहत्यांमध्ये देखील तितकीच उत्सुकता आहे.