बिग बी आणि बाहुबलीसोबत काय आहे दीपिकाचा Project-K ?

दीपिका आणि प्रभास यानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.   

Updated: Jul 24, 2021, 04:47 PM IST
बिग बी आणि बाहुबलीसोबत काय आहे दीपिकाचा Project-K ?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकांमध्ये वेगळंपण दिसून आलं आहे. प्रेक्षकांसमोर भूमिका साकारत असताना दीपिका त्याच्या पात्राच्या अगदी जवळ गेलेली असते. अगदी जिवंतपणे पात्र कसं साकारायतचं हे बॉलिवूडच्या मस्तानीला चांगलच ठावूक आहे. 

त्यात आता दोन मोठ्या स्टार्ससोबत दीपिकाने आपल्या आगामी सिनेमाचा श्री गणेशा केला आहे. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि साऊथ स्टार बाहबुली अर्थात प्रभाससोबत दीपिका लवकरच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

दीपिकाच्या या सिनेमाचं शुटींग नुकतच सुरु करण्यात आलं आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर सिनेमाच्या शुटींगला कलाकारांनी सुरुवात केली आहे. दीपिका आणि प्रभास यानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 

ही बिग बजेट फिल्म असणार आहे. Project-K असं या सिनेमाचं शीर्षक देण्यात आल्याचं समजतंय. सेटवरील क्लॅप बोर्डचा एक फोटो नुकताच समोर आला आहे.तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.