Athiya Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी ही सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. अथिया मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी देखील ती सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. ती सध्या चर्चेत असण्याचं कारण हे लॅक्मे फॅशन वीक आहे. तिचा या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण यावेळी सगळ्यांचे लक्ष हे अथियानं नाही तर तिच्या मागे सुरु असलेल्या सीननं वेधले आहे. लोकांचे म्हणणे आहे की अथियापेक्षा तिच्या मागे असलेल्या लाइमलाइटनं वेधले आहे.
अथियाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. अथिया ही खूप कमी चित्रपटांमध्ये दिसते. नुतकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये अथिया ही रॅम्प वॉक करताना दिसत आहे, तर दुसरीकडे तिच्या बॅक ग्राऊंडला काही मॉडेल बसल्याचे दिसत आहे. त्यात असेलेल्या एका मेल मॉडेलची रिअॅक्शन पाहून अनेक नेटकरी हैराण झाले आहेत. त्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांना त्यांचं हसू अनावर होत नाही आहे.
या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'तिच्या मागे असणारा त्याच्या अंघोळीची प्रतिक्षा करत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'हे बॅकग्राऊंडला काय सुरु आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'तिच्या मागे बसलेल्या त्या पुरुष मॉडेलनं तिचं स्क्रिन टाईम घेतलं.'
हेही वाचा : 'मी त्यां दोघांच्यामध्ये कबाब में हड्डी होतो'; सोनाली बेंद्रेसंदर्भात अभिषेक बच्चनचा मोठा खुलासा
अथिया विषयी बोलायचे झाले तर तिचा जन्म 5 जानेवारी 1992 रोजी शेट्टी कुटुंबात झाला होता. अथिया ही सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची लेक आहे. तिचा भाऊ अहान शेट्टी देखील वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रातच आहे. शाळेत असताना अथिया अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत नाटकांमध्ये भाग घ्यायची. अथियानं 2015 मध्ये हीरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिनं आजवर खूप कमी चित्रपट केले आहेत. सगळ्यात शेवटी अथिया 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात दिसली होती. तर यंदाच्या वर्षी 23 जानेवारी रोजी अथियानं बॉयफ्रेंड केएल राहुलशी लग्न केलं.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.