CID Show Comeback : मालिका पुन्हा सुरु होण्याबाबत शिवाजी साटम यांच्याकडून मोठी माहिती समोर

CID हा लोकप्रिय शो अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

Updated: Jan 19, 2022, 07:32 PM IST
CID Show Comeback : मालिका पुन्हा सुरु होण्याबाबत शिवाजी साटम यांच्याकडून मोठी माहिती समोर title=

मुंबई : CID हा लोकप्रिय शो अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे, 21 वर्षे टीव्हीवर राज्य करणारा शो ऑक्टोबर 2018 मध्ये बंद झाला. तथापि, आजही प्रेक्षक या शोच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत आणि आता जी गोष्टी समोर आली आहे ती ऐकून तुम्हाला ही वाटेल की हा शो भविष्यात नवीन स्वरूपात पाहायला मिळेल.

त्याच कारण म्हणजे टीव्ही शो सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांची समोर आलेली एक मुलाखत.  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवाजी साटम यांनी जे विधान केलं आहे त्यामुळे सगळ्यांनाच हा टीव्ही शो पुन्हा सुरु होणार का असा प्रश्न पडला आहे. 

सीआयडी नव्या स्वरूपात परत येऊ शकते, असे संकेत शिवाजी यांनी दिले आहेत. यासोबतच, अभिनेते शिवाजी साटम यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की हे सर्व अद्याप अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे याबद्दल ठोस काहीही सांगता येणार नाही.

7 facts about the iconic CID show to make you nostalgic - The Better India

मुलाखतीदरम्यान एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटम यांना विचारण्यात आले की, तुम्ही पुन्हा एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारण्यास तयार आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना शिवाजी म्हणाले, 'जर उद्या हा शो सुरू झाला तर सर्वप्रथम मी त्याला हो म्हणेन'.

शिवाजी साटम पुढे सांगतात, 'एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारताना मला कधीच कंटाळा आला नाही, पण घरी बसून कंटाळा आला आहे.  चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसण्यापूर्वी शिवाजी साटम बँकेत कॅशियर होते.