या अटीवर जुबैर खान 'बिग बॉस'मध्ये परतणार

बिग बॉसचे अकरावे पर्वदेखील वादात अडकले आहे.

Updated: Oct 11, 2017, 06:41 PM IST
या अटीवर जुबैर खान 'बिग बॉस'मध्ये परतणार  title=

मुंबई : बिग बॉसचे अकरावे पर्वदेखील वादात अडकले आहे.

पहिल्याच आठवड्यात या शोमध्ये वादग्रस्त ट्विस्ट आले आहेत. जुबैर खानने झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर त्याला इमरजन्सी एक्झिट करून हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. 

'विकेंड का वार' या बिग बॉसच्या खास भागात सलमान खानाने जुबैरची कानउघडणी केली होती. आता जुबैर खाननेही सलमान खानवर पलटवार केला आहे. त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. तसेच एक्सप्रेस.डॉट कॉमशी बोलताना जुबैर  खान  म्हणाला , 'जर सलमान खानने माझी माफी मागितली तर मी बिग बॉसमध्ये परतण्याचा विचार करेन'. 

जुबैरने केलेल्या दाव्यानुसार जेव्हा तो लोणावळ्याहून परतला तेव्हा लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मग असं असताना व्होट्स कमी कसे मिळू शकतात ? असा सवालदेखील त्याने विचारला आहे. तसेच माझं आयुष्य जसे आहे तसे न दाखवता ते चॅनलला जसे पाहिजे तसे दाखवले जात आहे. 
म्हणूनच माझ्याबद्दल चूकीचे प्रतिमा तयार करणार्‍या सलमान खान आणि कलर चॅनल्सच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.