स्टेजवर डान्स करताना सपना चौधरी Oops मोमेंटची शिकार, पहा व्हिडिओ

हरियाणवी डान्सरपासून बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री सपना चौधरीच्या प्रत्येक पर्फामन्सवर चाहते भरभरुन प्रेम करतात. 

Updated: Jul 9, 2021, 09:03 PM IST
स्टेजवर डान्स करताना सपना चौधरी Oops मोमेंटची शिकार, पहा व्हिडिओ

मुंबई: हरियाणवी डान्सरपासून बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री सपना चौधरी आता भलेही आधीसारखे स्टेज परफॉर्मन्स देत नाही. मात्र तरिही तिचे चाहते अजूनही तिच्या प्रत्येक पर्फामन्सवर भरभरुन प्रेम करतात. तिचे जुने स्टेजशोचे व्हिडिओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. आता तिचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ती स्टेजवर थिरकताना दिसत आहे. मात्र हा डान्स करतेवेळी तिच्यासोबत असं काही घडलं, ज्याची आपण कल्पनाही करु शकणार नाही. त्यामुळे ती ओप्स मुमेन्टची शिकार झाली होती. 

या व्हिडिओमध्ये देसी क्वीन सपना चौधरी आपल्याच स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नाचत असताना सपनाचा बॅलन्स जातो आणि ती खाली पडते. यानंतर काय झालं हे पाहून तुम्हालाही स्वप्नाची चिंता वाटेल.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सपना डान्स करतेवेळी कशी पडते आणि प्रेक्षकांनी तिची चिंता व्यक्त करताच, त्याच क्षणी सपना तिच्या हुशारीने उठून पुन्हा तिचा डान्स सुरू ठेवते. यानंतर प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात तिचं कौतुक करतात.

अनेक हिट गाणी दिली आहेत
सपना चौधरीच्या हरियाणवी गाण्यांनी संपूर्ण देशात तिची एक वेगळी ओळख केली आहे. अनेक वर्षांनंतरही त्यांची बरीच हिट गाणी लोकांच्या ओठांवर कायम आहेत. यांत तिने आंख्यां का यो काजल, गजबन पाणी, सूलफा, छोरी बिंदास, इंग्लिश मिडियम पढ़ी, तेरी नाची नाचूं सू जैसे यासारखे सुपरहिट गाणी दिली आहेत. यानंतर ती 'बिग बॉस'ची एक भाग झाली आणि 'दोस्ती के साइड इफेक्ट 'या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.