Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

Oppenheimer OTT release: क्रिस्टोफर नोलनचा 'ओपनहायमर' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार एकदा पाहाच.

दिक्षा पाटील | Updated: Feb 22, 2024, 10:40 AM IST
Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट title=
(Photo Credit : Social Media)

Oppenheimer OTT release: हॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या 'ओपनहायमर' या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. किलियन मर्फीचा हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता हे जाणून घेऊया.

हा बायोग्राफिकल थ्रिलर चित्रपट 'ओपनहायमर' हा चित्रपट 21 जुलै 2023 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. किलियन मर्फीशिवाय एमिली ब्लंट, मॅट डेमन, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, फ्लोरेंस प्यूसोबत अनेक कलाकारा होते.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ओपनहायमर'ला अकादमी अवॉर्डमध्ये 13 नॉमिनेशन मिळाले होते. हा चित्रपट ऑस्करसाठी सगळ्यात जास्त नॉमिनेशन मिळवणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात 7 पुरस्कार मिळवले आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स 2024 मध्ये 8 कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळवलेत. गोल्डन ग्लोब विषयी बोलायचे झाले तर 'ओपनहायमर'नं 8 पैकी 5 नॉमिनेशन जिंकले आहेत. 

'ओपनहायमर' हा चित्रपट जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावरआधारित आहे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांना 'अॅटॉमिक बॉम्बचे जनक' म्हटले जात होते. सेकेंड वर्ल्ड वॉर दरम्यान, मॅनहट्टन प्रोजेक्टमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी ते ओळखले जातात. जगात असलेला पहिला न्यूक्लियर बॉम हा जपानच्या हिरोशिमावर टाकला होता. त्यात लाखो लोकांनी त्यांचा जीव गमावला होता. त्यात जे लोक वाचले त्यांना अनेक आजार झाले.' थोडक्यात या चित्रपटात ओपेनहायमरच्या पहिल्या अणुचाचणी 'ट्रिनिटी'बद्दल दाखवण्यात आलं आहे. 

हेही वाचा : PM च्या नातीनं डेब्यू करताच बॉलिवूडवाल्यांना लावलं वेड! आता म्हणते '30 वर्षांच्या करिअरमध्ये...'

कुठे पाहायला मिळणार हा चित्रपट?

हा चित्रपट जियो सिनेमा या अॅपवर प्रदर्शित होणार आहे. तर 21 मार्च रोजी हा चित्रपट तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 

किती होतं चित्रपटाचं बजेट?

ओपनहायमर या चित्रपटाचं बजेट 826 कोटींचे आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटानं जगभरात 6050 कोटींचं कलेक्शन केलं, तर भारतात या चित्रपटानं 130 कोटींचे कलेक्शन केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.