मुंबई : प्रदर्शनाआधीच वादात सापडलेला पद्मावत सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. दरम्यान करणी सेनेने पद्मावतला विरोधा काय ठेवला आहे.
मुंबई-पुण्यातील सिनेमागृहात थिएटर्सच्या बाहेर सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे.
थिएटर्सच्या बाहेर खाजगी सुरक्षा बलही तैनात करण्यात आले आहे.
बुधवारी एका शाळेतील २० ते २५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर पद्मावत सिनेमाला कडाडून विरोध करणाऱ्यांनी बसवर हल्ला चढवला. जी डी गोयनका वर्ल्ड शाळेतील विद्यार्थी घरी जात असताना जवळपास ६० प्रदर्शन करणाऱ्यांनी लाठ्यांनी बसवर हल्ला केला.
जबरदस्तीने या विरोधकांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं. ड्रायव्हरने लक्ष न दिल्यामुळे विरोधकांनी शाळेच्या बसवर हल्ला केला.
गुरूग्राम पोलीस पीआरओ रविंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमधील कर्मचाऱ्यांनी मुलांच्या सुरक्षेचा पहिला विचार केला.
शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी सीट खाली लपवले आणि ड्रायव्हरला बस न थांबवण्यास सांगितलं. पोलिसांनी सांगितले की, बसवर अनेक हल्ले केले. अनेक मुलांनी मदतीसाठी आवाज देखील दिला. या सगळ्या प्रकारात मुलांना कोणतीही इजा झालेली नाही.