पाहिले न मी तुला : मालिकेतील अनिकेत 'या' कारणामुळे मालिकेपासून दूर

मालिकेचं शुटिंग महाराष्ट्राबाहेर 

Updated: May 12, 2021, 07:52 AM IST
पाहिले न मी तुला : मालिकेतील अनिकेत 'या' कारणामुळे मालिकेपासून दूर  title=

मुंबई : सध्या मनोरंजन क्षेत्रातील अनेक मालिका या महाराष्ट्र बाहेर शूट केल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे मालिकेच्या शुटिंगकरता महाराष्ट्रात परवानगी नाही आहे. मालिके बाहेर शूट करत असतानाही अनेक कलाकार मालिकेतून गायब झालेले दिसत आहेत. 

झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' ही मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहेत. या मालिकेचं राज्याबाहेर शूटिंग चालू असलं तरी त्यातील प्रमुख कलाकाराला कोरोना झाला होता. त्यामुळे त्याला काम करता आलं नाही. पण आता त्याने पुन्हा एन्ट्री जोमात घेतली आहे. तर कोण आहे हा कलाकार.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aashay Kulkarni (@aashaykulkarni)

पाहिले न मी तुला या मालिकेचे चित्रीकरण गोव्यात सुरू होतं. या दरम्यान मालिकेतील प्रमुख पात्र अनिकेत म्हणजे आयश कुलकर्णी याला कोरोनाची लागण झाली. योग्य तो उपचार घेत. क्वारंटाईन राहून त्याने पहिल्यांदा कोरोनावर मात केली. यानंतर गोव्यात शुट असल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी केली. तर पुन्हा त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. पुन्हा काही दिवस आयसोलेशनमध्ये राहून आता तो मालिकेत शुटिंग करण्यास सज्ज झाला आहे. 

मालिकेचं शुटिंग आता सिलवासाला होत आहे. पाहिले न मी तुला ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत.