आलियावर तोफ डागत 'बॉलिवूड चोर है', म्हणतेय पाकिस्तानी अभिनेत्री

पाकिस्तानी अभिनेत्रीचा आरोप

Updated: Aug 28, 2019, 02:14 PM IST
आलियावर तोफ डागत 'बॉलिवूड चोर है', म्हणतेय पाकिस्तानी अभिनेत्री title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 'प्राडा' गाण्यातून म्युजिक व्हिडिओ डेब्यू केला. आलियाच्या या गाण्याला बॉलिवूड कलाकारांसह अनेकांची पसंती मिळाली. पण पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात हिने 'प्राडा' गाण्यामुळे आलिया भट्टवर टीका केली आहे. मेहविशने बॉलिवूडवर पाकिस्तानी गाणी चोरण्याचा आरोप लावला आहे.

 
 
 
 

A post shared by Mehwish Hayat (@mehwishhayatofficial) on

आलियाचं 'प्राडा' हे गाणं पाकिस्तानी अल्बम 'वायटल साइन'च्या 'गोरे रंग का जमाना...' या गाण्याशी मिळतं-जुळतं असल्याचा दावा मेहविशने केला आहे. 

मेहविश हयातने बॉलिवूडवर कॉपी करण्याचा आरोप करत एक ट्विट केलं आहे. 'हे अतिशय विचित्र आहे. एकीकडे बॉलिवूडकडून प्रत्येकवेळी पाकिस्तानची निंदाच केली जाते. तर दुसरीकडे बॉलिवूड सतत आमची गाणी चोरत आहेत. कॉपीराइटचं उल्लंघन आणि रॉयल्टीचा यांना काही फरक पडत नाही' असं म्हणत तिने टीका केली आहे.

मेहविशने शाहरुख खानच्या 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजवरही टीका केली होती.

नेटफ्लिक्सवर 'बार्ड ऑफ ब्लड'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 'बार्ड ऑफ ब्लड'मध्ये अभिनेता इम्रान हाश्मी प्रमुख भूमिका साकारत आहे. इम्रानने कबीर आनंद नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. भारताचे 4 गुप्तहेर पाकिस्तानात पडकण्यात आल्यानंतर कबीर उर्फ एडोनिसला आणखी 2 लोकांसोबत सीक्रेट मिशनवर पाठवण्यात येतं. याच मोहिमेबाबत ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मेहविशने एका अवॉर्ड शोमध्ये, बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पाकिस्तानची चुकीची प्रतिमा सादर केल्याचा आरोपही केला होता.