बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्रींवर पाकिस्तानी क्रिकेटर्सचा जीव

या जोडया कोण आहेत? 

बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्रींवर पाकिस्तानी क्रिकेटर्सचा जीव  title=

मुंबई : क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्रींची लव्हस्टोरी ही काही नवीन नाही. हा सिलसिला तर अगदी अनेक दशकांपासून सुरू आहे. अनेकदा या अभिनेत्रींवर सीमा पार असलेल्या क्रिकेटर्सचा जीव अडकला. अशाच काही गोष्टी... जे प्रेम कधी लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचल्या नाही मात्र त्या लव्हस्टोरी भरपूर चर्चेत राहिल्या. 

जीनत अमान आणि इमरान खान 

जीनत अमान आणि इमरान खान यांच्या प्रेमाची चर्चा तर सरहदच्या पार असलेल्या मीडियाने देखील छापल्या. त्याकाळी पाकिस्तानी क्रिकेटर इमरान खान अतिशय हँडसम आणि स्मार्ट होता. जीनत टूरच्या निमित्ताने पाकिस्तानमध्ये गेली तेव्हा तिची भेट इमरान खानसोबत झाली. मात्र या दोघांचे हे संबंध फार काळ टिकले नाहीत. 

सानिया मिर्जा - शोएब मलिक 

सानिया मिर्जा - शोएब मलिक यांनी 12 एप्रिल 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केलं. सानिया आणि शोएब यांच्या लग्नाच्यावेळी खूप गोंधळ झाला होता. खूप लोकांनी सानियाच्या या निर्णयाला विरोध केला. 

शोएब अख्तर आणि सोनाली बेंद्रे 

पाकिस्तानचा रावलपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा फास्ट बॉलर शोएब अख्तरचा जीव बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर आला. शोएब एवढं देखील म्हणाला की, जर सोनाली त्याची नाही झाली तर मी तिला किडनॅप करेन. त्यानंतर सोनालीने गोल्डी बहलसोबत लग्न केलं. 

रीना रॉय - मोहसिन खान 

लोकप्रिय रीना रॉय आणि पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान यांची लव्हस्टोरी तर आपल्याला माहितच आहे. मोहसिनने आपलं करिअर संपवून रीनासोबत लग्न केलं. मात्र या दोघांच नातं फार काळ टिकलं नाही. रीना पुन्हा एकदा भारतात परतली. 

सुष्मिता सेन आणि वसीम अकरम 

अभिनेत्री सुष्मिता सेनचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरमसोबत जोडलं गेलं होतं. दोघांची ओळख एक टीव्ही रिअॅलिटी शो मध्ये झाली. या दोघांच नातं जवळपास 6 महिने चाललं. नंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.