पालघर प्रकरणावर अभिनेता फरहान अख्तरची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्हायरल 

Updated: Apr 20, 2020, 01:44 PM IST
पालघर प्रकरणावर अभिनेता फरहान अख्तरची प्रतिक्रिया  title=

मुंबई : पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात चोरीची शंका आल्यामुळे तीन लोकांना बेदम मारण्यात आलं. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ११० लोकांना ताब्यात घेतलं आहे. पालघर प्रकरणात अभिनेता फरहान अख्तर यांनी ट्विट करून आपलं मत व्यक्त केलं आहे. 

पालघर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल आला आहे. या हिंसेच्या घटनेचा कडाडून विरोध केला जात आहे. ३ लोकांचा जीव या प्रकरणात गेला आहे. अशा उपद्रवी गर्दीला समाजात कुठेही जागा नाही. असं म्हटलं आहे.  

फरहान अख्तरचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटमधून फरहान अख्तरने घटनेचा कडाडून विरोध केला आहे. सध्या राज्यभर गाजत असलेल्या पालघर हत्याप्रकरणाबाबत अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी रविवारी रात्री ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.