भाऊ-कुशलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पुन्हा एकदा लवकरच 'ही' जोडी येणार तुम्हाला हसवायला

 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले विनोदवीर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या पांडू सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. 

Updated: Nov 18, 2023, 07:03 PM IST
भाऊ-कुशलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पुन्हा एकदा लवकरच 'ही' जोडी येणार तुम्हाला हसवायला title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले विनोदवीर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या पांडू सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. अश्यातच आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे दिग्दर्शक विजू माने यांनी सोशलमिडीयावर शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

नुकतेच पांडू सिनेमाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मिडीयावर आपल्या कलाकार मित्रांचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त करत ते म्हणाले की, ''मला फोटो काढायला खूप आवडतं. especially portraits. एकेक चेहरा ईश्वराची एकेक गोष्ट असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यात मला एक सिनेमा दिसतोच. कधीतरी ह्या चेहऱ्यांच्या गोष्टी तुम्हाला शेयर करेन म्हणतो. दिवाळीत मी खूप लोकांचे फोटोस काढलेत . खूप गोष्टी पोतडीत जमा झाल्यात. त्यातला हा पहिला stock.''

या पोस्टला प्रतिक्रीया देत कुशलने 'ही पांडू सिनेमाचा दुसऱ्या भागाची घोषणा समजावी का ?' अशी कमेंट केली आहे. या कमेंटला उत्तर देत दिग्दर्शक विजू माने यांनी "आता तू म्हणतोयस तर… करुयात चल”, अशी प्रतिक्रीया दिली. त्यामुळे पांडू सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे का ? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.  विजु मानेंनी  शेअर केलेल्या फोटातील कलाकार हे 'पांडू २' ची टीम असावी का ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन हे विजु मानेंनी केलं असून कुशल बद्रिके, भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णी तसेच इतर कलाकार हे मुख्य भुमिकेत होते. 

याशिवाय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हटके अंदाजाने  सिनेमाच्या पहिल्या भागाला तसेच सिनेमातील संगिताला प्रचंड लोकप्रियता मिळाली.  बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांपैकी एक पांडू सिनेमा आहे. त्यामुळे आता 'पांडू २' बद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. दिग्दर्शक विजू माने यांनी पांडू सिनेमा व्यतिरीक्त रेगे आणि स्ट्रगलर साला या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पांडू सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील गाणीही प्रचंड गाजली. केळेवाली हे गाणं इतकं हिट झालं की, प्रत्येकजण त्यावर रिल्स बनवू लागलं होतं. त्यामुळे पांडू २ या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेतच यात काहीच शंका नाही.