परमाणू चित्रपटाची रीलिज डेट पाचव्यांदा बदलली

  अभिनेता जॉन अब्राहम हा गेले अनेक दिवस बॉलिवूडपासून दूर आहे. 

Updated: Apr 25, 2018, 05:04 PM IST
परमाणू चित्रपटाची रीलिज डेट पाचव्यांदा बदलली title=

मुंंबई :  अभिनेता जॉन अब्राहम हा गेले अनेक दिवस बॉलिवूडपासून दूर आहे. लवकरच 'परमाणू' या चित्रपटातून तो पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे चर्चेचा विषय बनला होता. परंतू काही वाद विवादामुळे या चित्रपटाची रिलिज डेट बदलण्यात आली आहे.  क्रिआज एन्टरटेनमेंटसोबत झालेल्या वादविवादामुळे या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आले होते.  

 नवीन पोस्टर 

 चित्रपटाच्या निर्मात्यांकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टरद्वारा फिल्म मेकर्सनी बव्या तारखेची घोषणा केली आहे. नव्या तारखेनुसार आता परमाणू हा चित्रपट  25 मेला रिलीज होणार  आहे. यापूर्वी हा चित्रपट 4 मेला रीलिज होणार होता. 

 

 

 रिलिज डेटमध्ये केला बदल 

 परमाणू या चित्रपटामध्ये तब्बल 5 वेळेस बदल करणयत आले आहेत.  मागील वर्षी डिसेंबर महिन्यात रीलिज होणारा हा चित्रपट आता मे महिन्यात रिलीज होणार आहे.  जॉन अब्राहमसोबत या चित्रपटात डायना पेंटी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाची कहाणी भारतीय जवानांद्वारा पोखरणमध्ये करण्यात आलेल्या न्युक्लिअर बॉम्ब टेस्टवर आधारित आहे.