पती, पत्नी और वो सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

पानीपत सिनेमाला काँटे की टक्कर 

Updated: Dec 9, 2019, 03:12 PM IST
पती, पत्नी और वो सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन  title=

मुंबई : शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यनच्या 'पती, पत्नी और वो' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमाने तीन दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर देखील आहे. 

Boxofficeindia.com च्या रिपोर्टनुसार रविवारी 13.5 ते 14 करोड रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने शपक्रवारी 8.50 करोड रुपयांची शानदार ओपनिंग करत शनिवारी 11.50 करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. अशा प्रकारे या सिनेमाने आतापर्यंत 34 करोड रुपयांची कमाई केली आहे. रविवारी या कमाईत 20 टक्के वाढ झाली असून सोमवारी चांगली कमाई होईल अशी अपेक्षा आहे. 

कार्तिकच्या 'लुका छिपी'सोबत 'पती पत्नी और वो' सिनेमाची तुलना केली जात आहे. या सिनेमाचा विकेंड तुलनेत चांगला राहिला आहे. मात्र रविवारची कमाई जवळपास सारखी आहे.  एकंदर पाहता पहिल्या दिवशी 'पती पत्नी और वो' चित्रपटाने बाजी मारली आहे. तर आता विकएण्डला कोणत्या चित्रपटाप्रती चाहते आपले प्रेम व्यक्त करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी दोन्ही चित्रपटांना तीन स्टार दिले आहेत. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते.