मुंबई : सोनी टीव्हीचा लोकप्रिय रिऍलिटी शो 'इंडियन आयडल १२' (Indian Idol 12) वेगवेगळ्या कारणांनी आजची चर्चेत आहे. त्यातील प्रमुख कारण म्हणजे स्पर्धेचा विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि पहिली रनर अप अरूणिता कांजीलाल. (Arunita Kanjilal) हे दोघं आपल्या गायनामुळे आणि त्यांच्यातील नात्यामुळे खूप चर्चेत आले. पण आता पवनदीप आणि अरूणिता कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरूणिता आणि पवनदीपवर ऑक्टोपस एंटरटेनमेंट कंपनीसोबत म्युझिक अल्बमचं शूट न करणे कसेच त्या गाण्याचं प्रमोशन न करण्याच्या आरोप लावण्यात आला आहे.
पवनदीप आणि अरूणिताला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ऑक्टोपस एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड द्वारा इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स एसोसिएशन (IMPPA)ने या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे की, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्राइवेट लिमिटेडने पवनदीप आणि अरुणिता हे आपली सेवा देणार असल्याचा एक करार केला होता.
ऑक्टोपस कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्या लोकांनी इंडियन आयडॉल २०२१ च्या विजेत्यांना २० रोमँटिक गाण्यांसाठी साइन केले. ऑक्टोपस एंटरटेनमेंटने पवनदीप आणि अरुणिता यांच्या संदर्भात सोनी पिक्चर्ससोबत केलेल्या करारानुसार, सोनीने दोन्ही कलाकारांच्या सेवा देण्याचे मान्य केले आहे.
इंडियन आयडॉलचा विजेता होण्यापूर्वी ही वचनबद्धता दिली होती. कंपनीच्या लोकांनी बराच पैसा खर्च करून हा अल्बम लाँच केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती, मात्र गाणे शूट केल्यानंतर कलाकारांनी निर्मात्याला सहकार्य केले नाही.
रिपोर्टनुसार, प्रथम अरुणिता आणि नंतर पवनदीप यांनी सोनीच्या वचनबद्धतेनंतरही निर्मात्याला शूटिंगमध्ये सहकार्य करणे थांबवले आणि नंतर गाण्याच्या रिलीज आणि प्रमोशनमध्ये सहकार्य केले नाही. सोनीला कळवल्यावरही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
उलट कलाकारांना पाठिंबा दिला. त्याचवेळी IMPPA ने सोनीला जाब विचारला असता त्यांनी सोनीची ही विशिष्ट कंपनी IMPPA ची सदस्य नसल्याचे सांगत तसे करण्यास नकार दिला.
ते म्हणाले की त्यांची सोनी कंपनी केवळ चित्रपट, वेब सिरीज तसेच मालिकांसाठी निर्मात्या सदस्यांसोबत काम करते. सोनीचे उत्तर मिळाल्यानंतर, IMPPA ने त्यांना निर्माते आणि कलाकारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली. त्यांनी दिलेल्या वचनबद्धतेचे पालन केले पाहिजे.