सुशांतला विसरली म्हणत अंकिताच्या 'या' चुकीमुळे भडकले चाहते

अंकिताला ही चूक पडली महागात 

Updated: Sep 19, 2020, 02:58 PM IST
सुशांतला विसरली म्हणत अंकिताच्या 'या' चुकीमुळे भडकले चाहते

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिवा लावून त्याला श्रद्धांजली अर्पण केली होती. तर कधी देवासमोर दिवा लावून म्हणलं,'आशा, प्रार्थना आणि ताकद!! जेथे कुठे असशील तेथे आनंदात राहा'. अंकिताची ही पोस्ट बघून अनेकजण भावूक झाले. मात्र आता शेअर केलेल्या पोस्टमुळे अंकिताचे चाहते चकीत झाले आहेत. 

अंकिताने केली मोठी चूक 

अंकिताच्या आताच्या इंस्टा पोस्टवर अनेक चाहते नाराज झाले आहेत. कारण या पोस्टमध्ये अंकिताने खूप मोठी चूक केली आहे. अशी कोणती चूक अंकिताने केली जामुळे सुशांत आणि अंकिताचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एकत्र तीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अंकिताने जी ट्राउजर घातली आहे. त्यामध्ये ओम असं लिहिलं आहे. जी चाहत्यांना अजिबातच पसंत पडलेली नाही. यामुळे अंकिता सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. 

अंकिताच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. 'सुशांतला विसरलीस दिदी' असं एकाने लिहिलं आहे तर एकाने 'अंकिता तुला असं लोअर घातलं नाही पाहिजे. यामध्ये ओम मंत्र लिहिला आहे.'